देश
कोरोनाची तिसरी लाट केव्हा पीक गाठणार?,पाहा तज्ज्ञ काय सांगतात
Published
1 year agoon
By
KokanshaktiPeak of Corona Third Wave : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात देशात तिसरी लाट केव्हा पीक गाठणार? यामुळे सर्वसामान्य लोक चिंतेत पडले आहेत. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय राय यांनी देशातील तिसऱ्या लाटेबाबत म्हत्वाची माहिती दिली आहे. डॉ. संजय राय यांच्यामते, भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्ण संख्या वाढेल, त्यानुसार तेथे कोरोना रुग्णवाढ पीक गाठेल. भारतात तिसऱ्या लाटेचा पीक फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतो, असेही राय यांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत आहे. पण पीकनंतर रुग्णांच्या संख्येत घट होते. सध्या देशात वाढणाऱ्या रुग्णसंख्या पाहाता ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. अशात तिसरी लाट आल्यानंतर पीक फेब्रुवारीमध्ये गाठेल असा अंदाज डॉ. संजय राय यांनी व्यक्त केला आहे. काही केलं तरी कोरोना रुग्णाची वाढ थांबवणं शक्य नाही. जगभरातील अनेक देश कोरोना रुग्णवाढ रोखू शकले नाहीत. लॉकडाऊन अथवा नाईट कर्फ्यूमुळे कोरोना रुग्णाची गती मंदावू शकते, पण रोखू शकत नाहीस असे संजय राय यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांतील देशातील रुग्णवाढ –
२८ डिसेंबर – नवीन रुग्णसंख्या 6,538
एक जानेवारी २०२२ – नवीन रुग्णांची वाढ 22,775
दोन जानेवारी – 27,553 नव्या रुग्णाची नोंद
तीन जानेवारी – 33,750 नव्या रुग्णांची नोंद
चार जानेवारी – 37,379 नव्या रुग्णाची वाढ
पाच जानेवारी – 58,097 नवीन रुग्णांची नोंद
सहा जानेवारी – 90,928 नवीन रुग्णांची नोंद
सात जानेवारी – 1,17,100 नव्या रुग्णाची नोंद
You may like
मास्कला तांब्याचं कवच, कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारतीय संशोधकांनी शोधलं नवे शस्त्र
निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार
COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी
Coronavirus-killing CHEWING GUM : कोरोनाला मारणाऱ्या च्युइंगमचा शोध
भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट असणे अनिवार्य
देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता