Connect with us

देश

ड्रायव्हिंग लायसन्स अन् आरसीचे नूतनीकरण करण्याकरता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या प्रक्रिया

Published

on

आयटी मंत्रालयाने नुकतेच जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ही माहिती दिलीय. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका अहवालात ही माहिती देण्यात आलीय. आधारशी जोडलेल्या बायोमेट्रिक माहितीच्या मदतीने लोकांना अनेक प्रकारच्या ऑनलाईन सुविधा दिल्या जाऊ शकतात.

नवी दिल्लीः तुमचा आधार क्रमांक हल्ली बऱ्याच कामात उपयुक्त ठरतोय. सर्वात मोठे कामही चुटकीसरशी केले जाते. आता आपल्याला कामाची आणखी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे, ज्यासाठी लोकांना कुठे जाण्याची आवश्यकता नाही. हे काम तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC शी संबंधित आहे. येत्या काळात तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचे घरी बसून नूतनीकरण करू शकाल, तेसुद्धा तुमच्या आधार कार्डवरून शक्य होणार आहे.

आयटी मंत्रालयाने नुकतेच जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ही माहिती दिलीय. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका अहवालात ही माहिती देण्यात आलीय. आधारशी जोडलेल्या बायोमेट्रिक माहितीच्या मदतीने लोकांना अनेक प्रकारच्या ऑनलाईन सुविधा दिल्या जाऊ शकतात. वाहनाचा शिकाऊ परवाना मिळवणे, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (DL), वाहन नोंदणी चलन (RC) बनवणे किंवा वाहनाच्या कागदावर पत्ता बदलणे, नंतर ही कामे आधारद्वारे घरी बसून करता येतात.

✅ रस्ते मंत्रालयाने काय म्हटले?

ऑगस्टमध्ये रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने आयटी मंत्रालयाला पत्र लिहिले. DL आणि RC शी संबंधित कामासाठी आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली होती.

यासाठी परिवहन मंत्रालयाने सुशासन (समाज कल्याण, नावीन्य, ज्ञान) नियम नमूद केले होते. परिवहन मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जर DL आणि RC चे नूतनीकरण आधारशी जोडले गेले तर बनावट कागदपत्रे बनवण्याची प्रक्रिया थांबेल.

आधार का आवश्यक आहे?

RC आणि DL मध्ये आधार वापरला जात नाही, त्यामुळे लोकांना अनेक ड्रायव्हिंग लायसन्स सहजरीत्या बनवता येतात. परिवहन मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जर नूतनीकरणाचे काम आधारशी जोडले गेले तर लोकांना आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि ही कामे घरी बसून ऑनलाईन करता येतील.

कोविडसारख्या साथीच्या आजारात लोकांना याचा खूप फायदा होईल आणि संपर्क टाळता येईल. परिवहन मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सुशासनासाठी आणि जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आधार प्रमाणीकरणाला परवानगी द्यावी, यामुळे भ्रष्टाचार थांबेल आणि सामान्य लोकांचे जीवन सुकर होईल.

✅ 2018 मध्ये आला नियम

वर्ष 2018 मध्ये परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी आधार अनिवार्य केले. पण नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की, सरकारी योजनांचा लाभ घेण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी आधार कार्ड अनिवार्य केले जाऊ शकत नाही.

जुलै 2019 मध्ये संसदेने एक सुधारणा विधेयक मंजूर केले की आधार हे स्वेच्छिक आधारावर ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला हवे असल्यास आधार द्या नाहीतर देऊ नका. इतर कोणतेही दस्तऐवज देखील ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकतात. तोच नियम आतापर्यंत चालू आहे.

परवान्यात आधार का आवश्यक?

जर एखादी व्यक्ती इतर काही राज्याची रहिवासी असेल, परंतु दुसऱ्या प्रांतात नोकरी करत असेल आणि त्यांच्याकडे वेगळे ड्रायव्हिंग लायसन्स असतात. नियमानुसार, एखाद्या व्यक्तीकडे एकच परवाना असावा, जो आधार सारखा सार्वत्रिक असावा.

प्रत्येक राज्यात फक्त एकच परवाना वैध असावा. हे तेव्हाच होईल जेव्हा परवाना आधारशी जोडला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्ससोबत आधार लिंक होताच डुप्लिकेट लायसन्स रोखण्यास मदत होईल.

आधार आणि परवाना याप्रमाणे लिंक करा 👇

💠तुमच्या राज्याच्या रस्ते वाहतूक विभागाची वेबसाईट उघडा
💠तेथे लिंक आधारवर क्लिक करा
💠ड्रॉप डाऊन मेनूवर जा आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडा
💠येथे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि गेट डिटेल्स पर्यायावर क्लिक करा
💠आता 12 अंकी आधार क्रमांक टाका, मोबाईल नंबरदेखील टाका. लक्षात ठेवा की, तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा
💠प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा
💠तुम्हाला मोबाईल क्रमांकावर एक OTP मिळेल
💠आता फॉर्ममध्ये OTP टाका, जेणेकरून आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्सची लिंकिंग पूर्ण होईल

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *