Connect with us

About

आमच्या बद्दल थोडंसं !

कोकणशक्ति हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्याची सुरुवात दि. १५ ऑगस्ट १९९२ साली संपादक बाळासाहेब सनये यांनी केली होती. आपल्या कोकणवासियांचं हक्कच एक असं वृत्तपत्र असावं या विचारातून संपादक बाळासाहेब सनये यांनी कोकणशक्ति हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले आणि नंतर ते मुंबई आणि उपनगरातून देखील प्रसिद्ध होऊ लागले.

साप्ताहिक प्रमाणेच बाळासाहेब सनये यांनी कोकणशक्ति याच नावाने वार्षिक मासिकाची सुरुवात देखील त्याच वर्षी केली. ते मासिक ‘दिवाळी अंक’ म्हणनू वाचकांच्या भेटीला दरवर्षी न चुकता येते. हा दिवाळी अंक साहित्याने आणि इतर माहितीने परिपूर्ण असतो.

जस जस आपल्याकडे डिजिटलायझशन वाढत गेलं तस तस कोकणशक्ति वृत्तपत्र ही बदलत गेलं. सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून आणि आता kokanshakti.com च्या माध्यमातून नाव नवीन माहिती, आणि घडामोडी घेऊन येत असत.

कोकणशक्ति हे आता फक्त कोकणापुरतं सीमित नसून संपूर्ण जगातील नाविन्यपूर्ण माहिती आपल्या वाचकांना घेऊन येत असत.

Balasaheb Sanaye

बाळासाहेब सनये

संस्थापक संपादक

KOKANSHAKTI.com

कोकणशक्ति हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे.

डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘कोकणशक्ति’चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘कोकणशक्ति’चा कटाक्ष आहे.

Advertisement