Connect with us

ब्लॉग

आजच्या या महागाईच्या काळात १००० स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो

Published

on

[ad_1]

मित्रांनो, आजच्या महागाईच्या काळात आपल्यापैकी प्रत्येकाचं स्वतः चे एक प्रशस्त घर असावे, असे मोठं स्वप्न असते. कारण दिवसेंदिवस वाढणारी कन्स्ट्रक्शनच्या किंमती, घराची चिंता सर्वच मध्यवर्गांतील लोकांना सतावत आहे. जितकं मोठं कर्ज तितकं मोठं टेंशन, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला व्यक्ती मनमोकळेपणाने जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाही आणि जगण्याचा निर्भेळ आनंदापासुन तो दुरावतो.

मात्र स्वतः बांधलेल्या घरात राहण्यासारखे दुसरे सुख जगात दुसरे कोणतेही नाही. आपल्याकडे आपल्या स्वतःच्या घरांत एक अतिरिक्त-मोठा बेडरुम आणि असाधारण स्नानगृहे, स्वयंपाकघराची इच्छा असते. मात्र बहुतेक घर बांधण्या पेक्षा, त्याऐवजी साधे तयार झालेले अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेत असतात. कारण घर बांधकाम खर्च जास्त आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया त’णावपूर्ण आहे.

जेव्हा आपण एखादा अंदाज विचारात घेतल्यास, आपल्याला चिन्हांकण आणि उत्खनन, काँक्रीट कंत्राटदार, विद्युत काम, नळ काम, फॉर्मवर्क आणि फ्रेमवर्क, बोअरवेल, कंपाऊंड भिंती आणि दरवाजे, प्रवेशद्वार या गोष्टीवर आपले घर बांधताना जास्त खर्च होत असतो.
याशिवाय वाळू, पाणी, स्टील आणि मजबुतीकरण, विटा, दगड, पेंट्स, स्वच्छताविषयक, पोशाख, फ्लोअरिंग, दारे, माती, सिमेंट यासारख्या कच्चा मालावरही खर्च होत असतो.

कारण या कच्या मालाच्या किंमती साधारपणे, बाजारापेठेतील, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतात. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,आपल्या घराचा जवळजवळ 40 % खर्च हा मजुरीवरील होत असतो .त्यामुळे घर बांधताना या काही गोष्टीचा विचार केला जातो.

1.बांधकाम सुरु करण्याआधी – नेहमी प्लॉट विकत घेताना एक काळजी घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे रोडपासुन जमीन घेताना फार खाली किंवा खड्ड्यातील जमीन चुकूनही खरेदी करू नये. कारण कटींग/फिलींग करुन जमीन लेव्हल करण्यासाठी भरपूर वेळ आणि वेळ वाया जातो.

याशिवाय तितके फर्निचर जसं की कपाटे, शेल्फ आणि सिटींग, सिव्हील वर्कमध्ये बनवल्यास प्लायवुडमध्ये फर्निचर बनवण्याचा अवाढ्यव्य खर्च वाचतो.

2.मटेरीअल:- घर बांधण्यासाठी लागणारे, सामानाची किंमत ही ट्रान्सपोर्टेशनमुळे वाढत असते, म्हणुन स्थानिक पातळीवर असलेल्या मटेरिअलचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर असावा. उदा.यामध्ये आपण मार्बल, ग्रॅनाईट खरेदी करण्याऐवजी,आणि वाहतूक खर्च वाचवण्यासाठी, सिंमेंट मध्ये चुन्याची भुकटी मिसळुन सुंदर फ्लोरींग बनवली जाते.

3.वीटकाम – भाजलेल्या मातीच्या लाल वीटा वापरण्याऐवजी सॉलीड कॉक्रीट ब्लॉक वापरल्याने आपले खर्च कमी होऊ शकतो. तसेच याशिवाय बाहेरील भिंत 9 इंची बांधकाम करण्याऐवजी,6 इंच वीटकाम करावे. यासाठी आतल्या भिंतीसाठी 4 इंची वीट वापरावे.

4. नऊ इंच वीटकाम करायचेच झाल्यास, याशिवाय आपल्याला आपल्या घराचे भिंत ही परंपरागत पद्धतीने बांधण्याऐवजी रॅट ट्रॅप बॉंडची पद्धतिचा वापर करावा.कारण यामुळे आपले जवळजवळ 25 टक्के पैसाची बचत होते, याशिवाय त्यात हवा खेळती राहते, त्यामुळे साध्या बांधकामापेक्षा ही रुम उन्हाळ्यात अधिक थंड आणि हिवाळ्यात अधिक गरम राहते.

5. याशिवाय आपली पैसाची बचत करण्यासाठी,घर बांधताना नेहमी आपल्या दरवाजे खिडक्यांच्या वर rcc लिंटेल टाकण्याऐवजी, ब्रिक आर्चेस बनवाव्यात.तसेच खर्च कमी होऊन, त्या खुप आकर्षक डिसत असतात. यासोबतच प्लास्टरचा आणि पिओपीचा तसेच कलरचा खर्चत बचत होते.

6.दरवाजे आणि खिडक्या:- यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या आकाराच्या खिडक्या डिझाईन केल्या जातात. तसंच एकापेक्षा अधिक खिडक्या सोडुन क्रॉस व्हेंटेलेशनद्वारे खेळती हवा ठेवण्यावर भर असतो.लाकडी दरवाजे किंवा भिंतीऐवजी प्रिकास्ट सिमेंट किंवा स्टील सेक्शनच्या चौकटी वापरल्यास २५ % बचत होते.

7.स्लॅब:- आपण सर्वजण सरसकट ५” जाडीचा कॉन्क्रीट स्लॅब भरण्यापेक्षा , त्या भागात, वीटा, टाईल्स किंवा सेल्युलर कॉन्क्रीट ब्लॉकचा वापर केल्यास, ते सुरक्षित आहे तसेच आणि हा स्लॅब आकर्षक, लक्षवेधुन बनतो. याशिवाय आपल्या पैसातही बचत होत असते. कारण आपला यासोबतच प्लास्टर, पिओपी, कलर आणि फॉल्स सिलींग करण्याचा खर्च वाचतो.

ह्या आणि अशाच खुप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरुन बांधकाम कॉस्ट २५% पर्यंत वाचवली जावु शकते. आर्कीटेक्ट इंजिनीअरची फीज ही बिल्डींग कॉस्टच्या तीन ते पाच टक्के असते, जितकी बांधकाम कॉस्ट जास्त तितकी फीज जास्त, ह्या समीकरणामुळे की काय, कॉस्ट कमी करण्याबाबत फारसा उत्साह दिसत नाही.

तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे १००० चौरस फूट घर बांधण्यासाठी येणारा खर्च, तर आजकाल सुमारे १२०० रुपये प्रति चौ. फूट ते रू. १५00 प्रति चौ. फूट पर्यंत आपल्याला संपूर्ण घराचे काम करून मिळू शकते. म्हणजेच यातील आपण ठरवलेल्या दरामध्ये आपल्याला घराचा पायापासून ते छतापर्यंत संपूर्ण काम करून मिळते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *