Connect with us

मुंबई

वीस गाड्या आणि 260 प्रवासी आणि पर्यटक वाहून नेणारी पहिली अत्याधुनिक बोट पुढील डिसेंबर पर्यंत सुरू होणार.

Published

on

Mumbai alibaug boat
काशीद , मुरुड जंजिरा ,दिवेआगर ,श्रीवर्धन, हरिहरेश्वर येथील पर्यटकांना सुविधा व चालना देणारी मुंबई दिघी बोटसेवा पुढील वर्षभरात सुरू.
पुढील वर्षभरात मुंबई ते काशीद , मुरुड जंजिरा, दिवेआगर आणि श्रीवर्धन येथे पर्यटकांना थेट जाण्यासाठी हाय स्पीड बोट सुविधा सुरू होणार. या बोटीतून स्वतःच्या कार आणि गाड्या घेऊन पर्यटक थेट कोकणात पर्यटनासाठी जाऊ शकतील. मुंबई-गोवा हायवे वरील खड्डे, आणि प्रवासात ताण कमी व्हावा म्हणून , आणि कोकणच्या अमाप निसर्गसौंदर्याचा आनंद पर्यटकांना समुद्रातून घेता यावा म्हणून भाऊचा धक्का अलिबाग या आलिशान बोटी प्रमाणेच ही बोट सेवा कोकणसाठी सुरू होणार आहे.
अलिबाग बोट सेवेमुळे अलिबाग मधील पर्यटनामध्ये प्रचंड फरक पडला. मुंबईतील प्रथम दर्जाचे पर्यटक आपल्या गाड्या घेऊन थेटपणे अलिबागमध्ये येऊ लागले. अशाच पद्धतीने ही बोट सेवा सुरू झाल्यानंतर काशीद ,मुरुड जंजिरा ,दिवेआगर, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर येथील पर्यटन उद्योगाला खूप मोठी मदत मिळणार आहे. या परिसरातील पर्यटन उद्योग प्रचंड वेगाने विकसित व्हायला सुरुवात होणार आहे.
समृद्ध कोकण चळवळीचे आधारस्तंभ आणि आमचे मित्र परदेशात या क्षेत्रात काम करणारे कोकणचे सुपुत्र गौतम प्रधान हे ही बोट सेवा सुरू करत आहेत. त्यांच्या या उद्योगामुळे आणि उपक्रमामुळे कोकण पर्यटन विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे. जगभरातील व देशातील कोकणी उद्योजकांनी कोकणात अशा स्वरूपाचे विविध उपक्रम भविष्यात विकसित कराव्यात याकरिता ग्लोबल कोकण कायमच सहकार्याची भूमिका घेणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा विमानसेवा सुरू झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात आम्ही मुंबई ,पुण्यातील आणि जगभरातील कोकणी उद्योजकांना खास विमानाने एक टूर आयोजित करीत आहोत. सिंधुदुर्गातील पर्यटन विकसित व्हावे आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प सिंधुदुर्गात विकसित होण्यासाठी कोकणवासीय उद्योजकांनी गुंतवणूक करावी ज्यासाठी विशेष अभ्यास सहल आयोजित करीत आहोत. सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी हा विशेष उपक्रम ग्लोबल कोकण राबवित आहे.
कोकणच्या विकासाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त कोकणवासीय उद्योजकांनी आणि तरुणांनी सहभागी व्हावे
याकरिता समृद्ध कोकण चळवळ राबवित आहोत. समृद्ध कोकणच्या पर्यटन विषयक उपक्रमांच्या माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा.
संजय यादवराव
समृद्ध कोकण प्रदेश संघटना

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *