शाळा सुरू होणार की नाहीत वाचा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
साधारणता मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीस पालकांची नेहमी गडबड असते ती मुलांच्या शाळेला लागणारे कपडे, वह्या, पुस्तके, दफ्तर घेण्यामद्धे, पण ह्या वर्षी गोष्टी वेगळ्याच आहेत.
करोना विषणूच्या भयानक संकटामुळे जणू काही आपल आयुष्य कोणी तरी एखाद्या विडियो Pause करून ठेवलंय. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर जवळपास सर्वच बंद आहे.
या करोनाच्या लॉकडावून मध्ये शाळा देखील बंद आहेत. अगदी मे महिन्याच्या सुरुवातीला असाच वाटत होत, की शाळा आता थेट जून महिन्यातच सुरू होतील.
पण जस जसा मे महिना संपतोय आणि जून महिन्याला सुरुवात होतेय, तस तस शाळा सुरू होण्याचे गूढ कायमच आहे. साहजिकच करोनाचा वाढता प्रभाव पाहता, राज्यातील शाळा निदान पुढील १५-२० दिवस चालू होणार नाहीत असेच वाटते.
सर्व पालक तसेच शिक्षक देखील संभ्रमात आहेत. शाळा कधी चालू होतील याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जाता आहेत.
म्हणूनच मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी प्रेसला संबोधताना शाळा सुरू होण्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, शाळा आता लगेच सुरू कारण सध्यातरी खूप अवघड आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले शहरातील शाळा सुरू कराव्यात की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण शहरातील शाळांमध्ये मुलांची पटसंख्या ही जास्त असते. हे सांगताना त्यांनी स्वत:च्या शाळेचे उदाहरण दिले.
ते म्हणाले मी ज्या शाळेत शिकत होतो तेथे एका बाकावर दोन मुले बसायची आणि ही परिस्थिति जवळपास सर्व शाळांमध्ये आहे. जारी शाळा आता बंद असल्या तरी कशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने शिकवण काशी चालू करता येईल, याच्यावर आमचा भर आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही सध्या मोबाइल कंपन्यांशी देखील बोलत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त मोबाइल डेटा विद्यार्थ्याना देता येईल. तसेच एकदा चॅनेल घेऊन ऑनलाइन पद्धतीने कसे देता येईल, याचा विचार चालू आहे.
ग्रीन झोनमधील शाळा सुरू करण्याबाबत काही जणांचा विचार होता, परंतु असे अर्धवट पद्धतीने शाळा चालू करणे योग्य नाही, त्याचप्रमाणे शाळेत गेल्याशिवाय मुलांना शिक्षण कसे देता येईल, याबाबत देखील तज्ञांच्या मदतीने चर्चा चालू आहे, असे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले.
2 comments