देश
निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार
Published
2 years agoon
By
KokanshaktiAssembly Elections In 5 States : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यांचा निवडणूक (Assembly Elections) कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक होणाऱ्या या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरचा (Covid Vaccination Certificates) मोदींचा फोटो हटवणार आहे. आचारसंहिता (Model Code Of Conduct) लागू झाल्यामुळे हे बदल होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रलायानुसार CoWin प्लॅटफॉर्मवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आवश्यक ते फिल्टर लावणार आहेत.
निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर निवडणुका 10 फेब्रुवारी आणि 7 मार्च दरम्यान सात टप्प्यात होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने घोषणेबरोबरच सरकार, उमेदवार आणि राजकीय पक्षांना आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Health Ministry will apply necessary filters on CoWIN platform to exclude picture of prime minister from COVID-19 certificates being given to people in five poll-bound states because of model code of conduct coming into force: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) January 9, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुासर, आचारसंहिता लागू झाल्याने पाच राज्यातील नागरिकांमध्ये जारी करण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हटवण्यासाठी आरोग्य मंत्रलायानुसार CoWin प्लॅटफॉर्मवर आवश्यक ते फिल्टर लावण्यात येणार आहे. मार्च 2021 मध्ये, काही राजकीय पक्षांना केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पदुच्चेरी निवडणुकांदरम्यान पाऊल उचलले होते.
You may like
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी काँग्रेस आणि भाजपकडून व्हिप जारी
पंतप्रधानांच्या उपस्थितीत गोवा-महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक;लोकसभा निवडणुकीवर उद्या खलबतं
10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत, CBSE अभ्यासक्रमात होणार बदल; पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा
सेमीकंडक्टर प्लांटसाठी भारत सरकार करणार 50 टक्क्यांची आर्थिक मदत
Amit Kambale Recruited By PM : पुण्याच्या अमित कांबळेला नियुक्तीपत्र, मोदी सरकारची नोकर भरती मोहीम
मास्कला तांब्याचं कवच, कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारतीय संशोधकांनी शोधलं नवे शस्त्र