Connect with us

मनोरंजन

Aryan Khan Bail: पहा सोनू सूद आणि मलाइका काय प्रतिक्रिया दिली

Published

on

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी अनेक बॉलिवूड स्टार्स आर्यनबद्दल पोस्ट करून आनंद व्यक्त करत आहेत.

अभिनेता सोनू सूदने ट्विटमध्ये लिहिले की, ‘वेळ जेव्हा न्याय देते, तेव्हा साक्षीदारांची गरज नसते.’

दुसरीकडे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिने लिहिले की, ‘थँक यू लॉर्ड’.

सोनू सूद आणि मलायका अरोरा व्यतिरिक्त, अभिनेता आर माधवनने ट्विट केले आणि लिहिले, ‘देवाचे आभार. एक वडील म्हणून मला खूप दिलासा मिळाला आहे… सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे.’

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने त्याच्या ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.