Connect with us

देश

COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी

Published

on

Coronavirus Vaccine News:  कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने भारत बायोटेकच्या 12 ते 18 वर्षाच्या नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायटेकच्या (Bharat Biotech) कोवैक्सीन (Covaxin) ला  15 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या आप्तकालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकच्या लहान मुलांसाठीच्या फेज 2 आणिल फेज 3 च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. वॅक्सिन ट्रायल तीन वयोगटात विभागण्यात आले आहे. पहिला वयोगट 2 ते 6 वर्षे, दुसरा 6 ते 12 वर्षे आणि तिसरा 12 ते 18 वर्षे आहे.

कधी पासून सुरू होणार वॅक्सीनेशन?

15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीये. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचं संकट वाढत असल्यामुळे 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.

त्याचबरोबर सहव्याधीग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिलीये. त्याचबरोबर जगातली पहिली डीएनए लस देखील भारतात तयार होत असल्याचं मोदींनी सांगितलंय.  तसच नाकाद्वारेही लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही मोदींनी दिली.