मनोरंजन
Sanjay Dutt – Rekha यांच्या लिंकअपवर नर्गिस दत्त त्यांनी तिला म्हटलं होतं डायन, ‘ती पुरुषांना असे संकेत देते की…’

[ad_1]
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची लव्ह स्टोरी तर आजही चर्चेली जाते. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार संजय दत्तच्या 308 गर्लफ्रेंड असल्याचा दावाही करण्यात आला होता. पण तुम्हाला संजय दत्त आणि रेखा यांची लव्ह स्टोरीबद्दल माहिती आहे का? रेखा आणि अमिताभ यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आहे. पण रेखा आणि संजय दत्त…काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊयात.
रेखा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. संजू बाबासारखेच तिचंही वैयक्तिक आयुष्य खास करुन तिची लव्ह लाइफ कायम चर्चेचा विषय ठरली आहे. झालं असं की, एकेकाळी रेखा आणि सुनील दत्त यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडायची. रेखा आणि सुनील दत्त यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे जेव्हा नर्गिस यांच्या कानावर पडलं तेव्हा त्या खूप संतापल्या होत्या.
Koimoi.com नुसार, संजय आणि रेखा या दोघांनी 1984 मध्ये ‘जमीन आकाश’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून रेखा संजय दत्तच्या नावावर सिंदूर लावते अशी अफवा पसरली होती. संजय दत्तची आई नर्गिस दत्तला यांना त्यावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांनी 1976 मध्ये रेखाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
त्यावेळी नर्गिस यांनी रेखा यांना डायन म्हटलं होतं. एवढंच नाही तर ”रेखा पुरुषांना संकेत द्यायची आणि सहज त्यांच्यासोबत जायला तयार होते, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्या पुढे असंही म्हणाल्या होत्या की, रेखा हरवली असून तिच्या आयुष्यात एका मजूबत माणसाची गरज आहे.”
रेखाचं नाव तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. संजय दत्त आणि रेखाच्या लग्नाची अफवा पसरली होती. त्यावेळी रेखाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारे लेखक यासिर उस्मान यांनी या सर्व अफवांचं खंडन केलं होतं. त्याशिवाय एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त यांनी सर्व गोष्टींचा इन्कारही केला होता.
[ad_2]