Connect with us

मनोरंजन

‘तुला कोण देणार गं चित्रपट?’ वजनावरून ट्रोल केलेल्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; ऐकून कराल कौतुक

Published

on

[ad_1]

Anjali Anand From Rocky Aur Rani Kii Prem Kahani: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. 28 जूलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलेली आहे.

करण जोहरनं या चित्रपटाच्या यशानिमित्त खास पार्टीचेही आयोजन केलेले होते. त्यामुळे त्याचीही विशेष चर्चा रंगलेली होती. या चित्रपटातील सर्वच पात्र ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सोबतच त्यांच्या अभिनयाचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग ही आपल्या हटके अभियासाठी ओळखली जातेच. तिनं मराठीसह हिंदीतही काम केलेले आहे. यावेळी या चित्रपटातूनही अभिनेत्री क्षिती जोगच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आलेले होते.

रंधावा कुटुंबियांतील क्षिती एक आहे. त्याचसोबत यावेळी याच कुटुंबियातील एक मेंबरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिचं वक्तव्यही चर्चेत आहे.

अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या बॉडी शेमिंगसाठीही ट्रोल केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगायला फार वेळ लागत नाही. प्लस साईज आणि त्यासंबंधी समाजामध्ये जागृकता पसरवली जावी म्हणून अनेक कलाकार, अभिनेत्री-अभिनेते, फॅशन डिझायनर्स हे प्रयत्नशील आहेत.

गेल्या सात एक वर्षांपासून या चळवळीला एकप्रकारे वेगही आलेला आहे. परंतु अजूनही ट्रोलर्स मात्र काही यावरून अभिनेत्रींना त्यांना वजनावरून आक्षेपार्ह बोलणं, टोमणे मारणं काही सोडतं नाहीयेत. विद्या बालन, राणी मुखर्जी, हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा अशा अभिनेत्रींना फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलेले आहे.

अभिनेत्री विद्या बालनला तर तुम्ही वजन कमी कधी करणार यावरूनही खूपदा ऐकवले आणि विचारले जाते. परंतु या अभिनेत्रींच्या उत्तरानं मात्र समोरच्यांची बोलती बंद केलेली असून त्यांचे कौतुकही समाजमाध्यमांमध्ये करण्यात आलेले आहे.

आता अभिनेत्री अंजली आनंद म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील गोलू हिच्या एका वक्तव्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.

सिद्धार्थ कन्नन यांच्याशी मुलाखत देताना अंजली आनंदनं सांगितले की, ”जेव्हा मी माझ्या करिअरला सुरूवात केली होती तेव्हा मला अनेकांनी टोमणे मारले की तु कुठली अभिनेत्री होणार आहेस? तेव्हा मी म्हणाले की मला चित्रपटांमधून कोणाची बेस्ट फ्रेंड व्हायचं नाही तर मला चित्रपटांतून मुख्य भुमिका करायची आहे.

माझ्या वजनावरून कोणी मला हिरोईनची बेस्ट फ्रेंड जी सतत बर्गर खात असते. मी माझ्या करिअरच्या सुरूवातीला तीन मोठे शोज केले होते आणि ते लीड केलेले होते. परंतु तेव्हाही काही लोकांना मला असे ऐकवले की आता तुला हे शो मिळाले पण परत दुसरा शो तुला कोण देणार? तुझ्यासाठी दुसरा शो कोण बनवणार? त्यासोबत असेही म्हणाले की तू तर टीव्ही शोज केलेस परंतु तुला कोण चित्रपट देणार? पण आज मी टीव्ही, वेबशोज, रिएलिटी शोज, चित्रपटही केले आहेत. तेव्हा आता तुम्हीच सांगा मी काय नाही करू शकत?”, असं उत्तर तिनं ट्रोलर्सना दिले.

‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हा शो केल्यानंतर तिला अनेकांनी टोमणे मारले होते त्यातला एक असा होता की आता या जाडीला दुसरा शो कोण देणार? ती यावर असंही म्हणाली की, ”लोकांना असंच वाटतं की बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊंचचा प्रकार आहे. परंतु आजच्या काळात असा विचार करणं मुर्खपणाचे ठरेल कारण तुमच्या आजूबाजूला कॅमेरे आहेत”, अशी स्पष्ट माहितीही तिनं दिली.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *