Connect with us

मनोरंजन

मला दारूचे व्यसन नसते तर…; रजनीकांत यांनी बोलून दाखवली आयुष्यातील मोठी खंत

Published

on

Rajinikanth Statement On Alcohol: रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या जेलर (Jailer) या बहुप्रतीक्षीत चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. येत्या 10 ऑगस्ट रोजी त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान रजनीकांतच्या एन्ट्रीने चाहत्यांची मन जिंकली आहेत. नेहमीप्रमाणेच रजनीकांत यांची एन्ट्री हिट ठरली. मात्र, या कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. रजनीकांत यांनी दारूच्या व्यसनाबाबत आणि त्यामुळं झालेल्या नुकसानीबाबत भरभरुन बोलले आहेत. (Rajinikanth Statement On Alcohol At Jailer Audio Launch)

सिनेमाच्या ऑडिओ लाँचच्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी हे वक्तव्य केलं आहे. दारू पिणं ही माझी चूक, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे. मला दारूचे व्यसन नसते तर मी सजामासाठी आणखी चांगले काम केले असते. करिअरकडे लक्ष दिलं असते. दारू पिणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. दारू पूर्णपणे सोडा असं माझं म्हणणं नाही. पण नियमित मद्यपान करु नका. दारू तुमचा आनंद आणि आरोग्य खराब करु शकते, असं म्हणत रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना मद्यपान न करण्याचा सल्ला दिला आहे.

रजनीकांत यांनी दारूच्या व्यसनाबाबत आधीही वक्तव्य केले होते. जानेवारीमध्ये तामिळ नाटकाच्या एका कार्यक्रमादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत होते तेव्हा ते बोलत होते. अभिनेता होण्याआधी मी कंडक्टर होतो तेव्हा रोज दारू प्यायचो. सिगरेटदेखील ओढायचो. दिवसातून दोन वेळा मांसाहार करायचो. पण माझी पत्नी लताने तिच्या प्रेमाने माझ्यात बदल घडवून आणला. तिने मला एक सामान्य व शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची सवय लावली, असं म्हणत रजनीकांत यांनी पत्नी लताचे आभार मानले आहेत.

ते पुढे म्हणतात की, दारू, सिगरेट आणि अती मासांहार या तीन गोष्टींची जे अति सेवन करतात त्या व्यक्ती वयाच्या साठीनंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत, असं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रजनीकांत यांचा आगामी चित्रपट जेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत मुथुवेल पांडियन यांच्या भुमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त तमन्ना भाटिया, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, मोहनलाल आणि योगी बाबूसह अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. नेल्सन दिलीप कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. तर, सन पिक्चर्सचे कलानिधी मारन हे निर्माते आहेत. त्याव्यतिरिक्त रजनीकांत यांच्याकडे लाल सलाम हा चित्रपट देखील आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *