मनोरंजन
अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर
Published
5 months agoon
By
KokanshaktiNew Delhi : बॉलिवूडमध्ये सतत पार्टी करणे एकदम नॉर्मल आहे. एखाद्या चित्रपटाची सक्सेस पार्टी (Success party) असो किंवा बर्थडे पार्टी (Birthday party) पण पार्टी म्हटलं की बॉलिवूडमध्ये (Bollywood) उत्साह पाहायला मिळतो. अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स सहभागी झाले होते. करिश्मा कपूर (Karishma Kapoor), वरुण धवन (Varun Dhawan), सारा अली खान (sara ali khan), सुहाना खान (Suhana Khan), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra), कियारा अडवाणी (Kiara Advani), मलायका अरोरा (Malaika Arora), क्रिती सेनन (Kriti Sanon), काजोल (Kajol), कार्तिक आर्यन (Karthik Aryan) यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. (ajay devgan daughter Nysa Devgan glamorous look viral video is out drishyam 2 nz)
या पार्टीत स्टार किड्स देखील पाहायला मिळाले. शनाया कपूर (Shanaya Kapoor), सुहाना खान (Suhana Khan), अनन्या पांडे (Ananya Pandey), नव्या नवेली नंदा (Navya naveli nanda), खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी आपल्या लूकने सर्वांना थक्क केले. त्याचवेळी काजोलची मुलगी न्यासा देवगनचा (Nysa Devgan) लूकही चर्चेचा विषय राहिला. न्यासा देवगणचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दिवाळी पार्टीला जाताना दिसत आहे.
वीरल भैयानीच्या (Viral Bhaiyani) इन्स्टा पेजवरून न्यासा देवगणचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या कारमध्ये मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला जाताना दिसत आहे. यादरम्यान न्यासाचा लूक पाहण्यासारखा आहे. न्यासा लेहेंग्यात खूपच क्यूट दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती काही तरी हसताना दिसत आहे. या व्हिडिओला अल्पावधीतच हजारो लाईक्स (Likes) मिळाले आहेत, ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट (Comment) करत आहेत. काजोल-अजय देवगणच्या मुलीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “हे सुंदर आहे”. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, “काजोलची मुलगी नैसर्गिकरित्या सुंदर आहे”. अशाप्रकारे या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
You may like
G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
‘या’ पाकिस्तानी चित्रपटानं मोडला RRR चा रेकॉर्ड? जाणून घ्या सत्य
मार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय
फाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स
बोनी कपूर यांच्या ‘या’ सवयीने त्रस्त होत्या श्रीदेवी; Janhvi Kapoor चा मोठा खुलासा
‘आजी म्हण तिला’, 12 वर्षांनी मोठी असणाऱ्या मलायकाला बेबी म्हणालामुळे अर्जुन कपूर झाला ट्रोल