Connect with us

मनोरंजन

‘या’ पाकिस्तानी चित्रपटानं मोडला RRR चा रेकॉर्ड? जाणून घ्या सत्य

Published

on

मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan)  चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 13 ऑक्टोबरला रिलीज झालेला ‘द लेजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत परदेशातही झेंडा रोवत आहे. रिपोर्ट्सनुसार, फवादच्या चित्रपटाने यूकेमधील एसएस राजामौली यांच्या साऊथचा ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’लाही मागे टाकले आहे.

वास्तविक, ‘RRR’ला पराभूत करण्याचा दावा ‘द लेजेंड ऑफ मौला जट’ या चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केला आहे. या दाव्यावर अनेक चाहते खूश असल्याचे दिसत असताना, दुसरीकडे काहीजण हे चुकीचे सांगत आहेत.

UK मधील कमाईबद्दल केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘आणखी एक दिवस, आणखी एक यश! The Legend of Maula Jatt या चित्रपटाने 2022 साली UK मध्ये केवळ 17 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून RRR च्या संपूर्ण कमाईला मागे टाकले आहे.

आता या पोस्टवर, जिथे काही नेटकरी दिग्दर्शक बिलाल लशारी यांचे अभिनंदन करत आहेत आणि ते चित्रपटाची जोरदार प्रशंसा करत आहेत, तर काहींनी म्हटले आहे की, ‘RRR ने जगभरात 1 हजार144 कोटी रुपये कमावले, मौला जाटनं 127 कोटी रुपये कमावले, तुलना करायची असेल तर, तुम्ही ते योग्य पद्धतीने करायला हवं, फक्त यूके का?’ दुसऱ्या नेटकऱ्या कमेंट केली, ‘वर्ल्डवाइड कलेक्शनचे काय?’ काही लोकांनी बिलाल लाशारी यांना राजा असेही संबोधले आहे.

मात्र, boxofficemojo ने दिलेल्या चित्रपटाच्या कमाईच्या रेकॉर्डमधील आकडे काही वेगळेच सांगत आहेत. ‘RRR’ ने UK मध्ये 9 कोटी रुपये कमावले आहेत, तर The Legend of Maula Jatt ने आतापर्यंत एकूण 6 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच ‘आरआरआर’च्या कमाईचा आकडा गाठण्यासाठी चित्रपटाला अजून काही वेळ आहे. (Pakistani Film The Legend Of Maula Jatt Starring Fawad Khan Beats Rrr In Uk)

फवाद खानचा चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट’ हा 1979 मध्ये आलेल्या ‘मौला जट’ चित्रपटाचा रिमेक आहे. फवाद खानसोबत या चित्रपटात माहिरा खान, हमजा अली अब्बासी आणि हुमैमा मलिक सारखे पाकिस्तानी कलाकार दिसणार आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *