Connect with us

मनोरंजन

Salman Khan च्या आधी Aishwarya Rai ‘या’ अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला ‘The End’

Published

on

[ad_1]

Famous Cat Fight : बॉलीवूड जगात अनेक प्रेम प्रकरण आहेत जे आजही गाजतात. रेखा अमिताभ बच्चन, सनी देओल डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित संजय दत्त आणि ऐश्वर्या राय सलमान खान.

या कधीही पूर्ण होऊ न शकलेल्या प्रेम कहाण्या आजही चर्चेल्या जातात. त्यातील अमिताभ आणि अमिताभ यांच्यानंतर सगळ्या प्रसिद्ध लव्ह स्टोरी (Aishwarya Rai Affair) ही ती ऐश्वर्या राय हिची. सलमान खान तिचं प्रेम प्रकरण खूप गाजलं होतं.

त्या प्रेम प्रकरणातील अनेक किस्से आजही समोर येतात. सलमान खानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ऑबेरॉय आला होता. पण तीही प्रेम कहाणी काही पूर्ण होऊ शकली नाही. आज ऐश्वर्या राय अमिताभ बच्चन यांची सून असून अभिषेक बच्चनची पत्नी आहे. (did you know aishwarya rai bachchan love affair with rajeev moolchandani before salman khan manisha koirala shocking revelation)

पण तुम्हाला हे माहिती आहे की, सलमान खानच्या आधी ऐश्वर्या एका अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती. मात्र या प्रेम कहाणीमध्ये एक व्हिलन आली आणि या लव्ह स्टोरीचा दी एन्ड्र झाला. बॉलीवूड जगात जेवढ्या प्रेम कहाणी आहेत तेवढ्याच दोन अभिनेत्रींची वैर असल्याचेही किस्से आहेत. या प्रेम कहाणीची व्हिलन दुसरी तिसरी कोणी नसून मनिषा कोईराला होती. आजही 29 वर्ष झाली आहेत पण Aishwarya Rai Manisha Koirala Cat Fight सुरुच आहे.

कोण होता ‘ती’ अभिनेता?

मनीषा कोईराला-ऐश्वर्या राय 90 च्या दशकातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. मनीषाच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1991 मध्ये सुभाष घई दिग्दर्शित सौदागर या चित्रपटातून झाली.

तर ऐश्वर्या राय बच्चनने 1997 मध्ये रिलीज झालेल्या ‘और प्यार हो गया’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मनीषा कोईरालाने ऐश्वर्या राय आणि प्रसिद्ध मॉडेल-अभिनेता राजीव मूलचंदानी याचं नाव जोडलं होतं.

मनीषाने 1994 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. ऐश्वर्याचं पहिलं प्रेम सलमान खान होतं असं सर्वांना वाटत असलं तरी हे खरं नाही. मनीषाच्या खुलाशानुसार, मॉडेल राजीव मूलचंदानी हा सलमानला डेट करण्यापूर्वी ऐश्वर्याचा पहिला क्रश होता.

ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती. त्यावेळी राजीव देखील मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होता. मात्र, जेव्हा अॅश मिस वर्ड बनली आणि चित्रपटांमध्ये एंट्री केली तेव्हा दोघांचे ब्रेकअप झालं आणि त्यानंतर राजीव मनीषाला डेट करू लागला होता.

aishwaryarairajeevmoolchandani

काय म्हणाली होती मनीषा

1994 मध्ये एका मासिकाला मुलाखत देताना मनीषा म्हणाली की, ती राजीव मूलचंदानीला डेट करत आहे. राजीवने ऐश्वर्याला माझ्यासाठी सोडलं. एवंढच नाही तर ”तिने राजीव आणि ऐश्वर्याचं प्रेमपत्र पाहिलं होतं जे राजीवने ऍशसाठी लिहिलं होतं.”

ऐश्वर्याच्या मते तो फक्त…

मनीषाच्या या मुलाखतीनंतर ऐश्वर्या चांगलीच अस्वस्थ झाली होती. ज्यावेळी मनीषाने ही मुलाखत दिली होती तेव्हा ऐश्वर्या इंडस्ट्रीत पदार्पण करत होती. तर मनीषा आधीच इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय होती.

मनीषाच्या मुलाखतीनंतर जवळपास 5 वर्षांनी ऐशने आपली प्रतिक्रिया दिली. 1999 मध्ये एका मासिकाला मुलाखत देताना ती म्हणाली की, मनीषाने जे दावा केला आहे तो बकवास आहे. तसंच तिने मनीषाने तिची प्रतिमा डागाळल्याचा आरोपही केला. सोबतच तिने राजीवसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाकारलं आणि तो आपला मित्र असल्याचं म्हटलं.

[ad_2]