Connect with us

मनोरंजन

अरबाज खानने गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत घालवलेल्या त्या रोमँटीक क्षणांची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

Published

on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तो अनेकदा त्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल-अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबत दिसतो. तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असतो. दोघांनी फोटो टाकू देत किंवा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत असतात. त्यात आता दोघेही मालदीवमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत. या सुट्टीतील गर्लफ्रेंडसोबतचे फोटो अरबाज खानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अरबाज खानने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अरबाज आणि जॉर्जिया दोघेही खूप रोमँटिक मूडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

अरबाज खानने त्याचा हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,’Enjoyed our stay at the Amaya Kuda Rah.. Thank you for the wonderful hospitality’.

या फोटोनंतर चाहतेही दोघांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने ‘दोघ एकत्र छान दिसत आहेत’ असे लिहिले आहे, तर कोणी ‘खूप सुंदर फोटो’ असे लिहिले आहे. तर एकाने ‘मलाईकापेक्षाही जॉर्जियासोबत जोडी शोभून दिसते’ असेही म्हटले आहे.

अरबाजने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘डरर’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात अरबाज एका सायको पतीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला होता. अरबाज गर्व-द प्राइड ऑफ ऑनर, दबंग, दबंग 2, हसल, प्यार किया तो डरना क्या, हॅलो ब्रदर यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचवेळी जॉर्जिया एंड्रियानी ‘वेलकम टू बजरंजपूर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जॉर्जियाने ‘कॅरोलिन आणि कामाक्षी’ या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ती गायक मिका सिंगसोबत ‘रूप तेरा मस्ताना’ या म्युझिक अल्बममध्ये दिसली. जॉर्जिया एंड्रियानी लवकरच ‘श्रीदेवी बंगला’ चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटात ती धमाकेदार आयटम नंबर करताना दिसणार आहे.

जॉर्जिया एंड्रियानीसोबत या चित्रपटात अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वारियर देखील दिसणार आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *