Connect with us

तंत्रज्ञान

तुम्ही देखील WiFi वापरताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं

Published

on

मुंबई : आजच्या काळात इंटरनेटशिवाय आपण राहू शकतं नाही. मुळात इंटरनेटशिवाय कोणताही स्मार्टफोन काहीही कामाचा नाही. म्हणूनच तर आपण इंटरनेट वापरण्यासाठी एकतर रिचार्ज मारतो किंवा मग वायफायचा वापर करतो. चांगल्या आणि जास्त स्पीडसाठी बरेच लोक WiFi चा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की WiFi वरुन इंटरनेट चालवणं तुम्हाला किती महागात पडू शकतो? हो हे खरं आहे. आपल्या सर्वांचा समस्या सोडवणारा इंटरनेट हा आपल्यासाठी नवीन समस्या देखील तयार करत आहे.

आजच्या काळात हॅकर्स वायफायच्या माध्यमातूनही तुमच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरत आहेत. हे कसे घडत आहे आणि ते टाळण्याचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊ या.

सार्वजनिक WiFi अनेक ठिकाणी स्थापित केले आहे, जे आपण पासवर्डशिवाय वापरू शकता. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, सार्वजनिक वायफाय हॅकर्ससाठी चोरी करण्याचा हा एक सामान्य आणि सोपा मार्ग आहे.

हॅकर्स दोन प्रकारे हल्ला करतात. पहिली पद्धत मॅन इन द मिडल (MITM) हल्ला आहे ज्यामध्ये हॅकर्स वापरकर्त्यांना फसवण्यासाठी आणि त्यांचा डेटा चोरण्यासाठी धोकादायक थर्ड पार्टी इंटरसेप्ट वापरतात.

तर हॅकर्सचा पॅकेट स्निफिंग अटॅक या दुसऱ्या प्रकारात हॅकर्स लोकांच्या फोनमध्ये सहज प्रवेश करतात आणि त्यांचा डेटा चोरतात. वास्तविक, पॅकेट स्निफिंग अटॅकमध्ये, हॅकर्सना वायफायद्वारे माहिती ऍक्सेस केली जाते.

परंतु या सगळ्या पद्धतींचा वापर करुन हॅकर्स तुमच्याकडून काय चोरू शकतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा सायबर हल्ल्यांमुळे हॅकर्स तुमचा पत्ता, तुमचे फोटो, व्हिडीओ आणि तुमचे बँक तपशील यासारखी महत्त्वाची माहिती चोरतात.

तुम्हाला अशा हल्ल्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्ही VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरावे. हे सार्वजनिक नेटवर्कवर देखील खाजगी नेटवर्क सुविधा प्रदान करेल आणि वापरकर्त्यांना सुरक्षितपणे इंटरनेट वापरण्याचे स्वातंत्र्य देईल.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.