Connect with us

तंत्रज्ञान

Amazon चा मान्सून सेल सुरु, ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काऊंट

Published

on

[ad_1]

मुंबई : अ‍ॅमेझॉनवर सध्या मान्सून कार्निव्हल सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर वस्तुंवर बंपर डिस्काउंट दिला जातोय. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत बंपर सूट मिळतेय. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळतेय.  (Amazon monsoon carnival sale start bumper discount in smartphone)

iPhone 12 खरेदी करायचा असेल, तर आता एक उत्तम संधी आहे. यामध्ये iPhone 12 चा 64GB व्हेरिएंट 54,900 रुपयांना विकला जात आहे. तर तुम्ही त्याचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट  59,900 मध्ये खरेदी करू शकता. याशिवाय कंपनी एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे.

iQOO 9 Pro 5G या स्मार्टफोनची मुळ किंमत 79,990 रुपये आहे. परंतु कंपनी सध्या यावर 10 हजार रुपयांची सूट देत आहे. याशिवाय ICICI कार्डधारकांना 4000 रुपयांची अतिरिक्त सूटही दिली जात आहे.

Xiaomi 12 Pro हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देखील देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 66,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. 

Samsung M32 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. कंपनी हा फोन 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह 20,999 रुपयांना विकत आहे. तुमच्याकडे सिटी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड असल्यास, किंमत 1500 रुपयांनी कमी होते.

iQOO Z6 Pro या स्मार्टफोनची किंमत सध्या 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ICICI कार्डवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. यावर तुम्ही एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता.

[ad_2]