Connect with us

तंत्रज्ञान

31 मिनिटांमध्ये फुल चार्ज! 600 किमीची रेंज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच, किंमत वाचून हादरा बसेल

Published

on

[ad_1]

भारतीय बाजारपेठेत एकामागोमाग एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत. याचदरम्यान आता जर्मनीमधील प्रमुख वाहन निर्माता कंपनी ऑडीने आपल्या कार कलेक्शनमध्ये आता इलेक्ट्रिक कार जोडली आहे. ऑडीने नुकतीच आपली इलेक्ट्रिक कार Audi Q8 e-tron ला भारतीय बाजारपेठेत आणलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरीमुळे ही कार ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे. ऑडीने या कारचं स्पोर्टबॅक व्हर्जनही लाँच केलं आहे. एकूण 4 व्हेरियंटमध्ये असणाऱ्या या कारच्या बेस मॉडेलची किंमत 1.14 कोटी पासून (Ex Showroom) सुरु होत आहे. कंपनीने या कारच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे. ग्राहक 5 लाख रुपयांची टोकन अमाऊंट देत कार बूक करु शकतात.

Audi Q8 e-tron दोन वेगवेगळ्या बॉडी टाइपमध्ये सादर करण्यात आली आहे. यामधील एक एसयुव्ही व्हर्जन असून, दुसरी स्पोर्टबॅक आहे. ही कार एकूण 9 एक्स्टिरियर आणि 3 इंटिरियर शेड्समध्ये उपलब्ध असेल. बाहेरच्या रंगात मडेरा ब्राऊन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मिथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे यांचा पर्याय आहे.तर दुसरीकडे, इंटिरियर थीममध्ये ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक यांचा समावेश आहे.

कशी आहे नवी Audi Q8 e-tron –

ऑडीने या कारला डिझाइन करताना अगदी नवी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रिलला ब्लॅक सराऊंडसह एक नवं मेश डिझाइन मिळत आहे, तसंच सोबत एक नवा लाइट बारही देण्यात आला आहे जो मॉडिफाइड हेडलँप्सला चांगला लूक देत आहे. Q8 e-tron मध्ये ऑडीचा नवा 2D लोगो देण्यात आला आहे, जो सॉलिड व्हाइट कलरसह येतो. या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने नव्या डिझाइनचे 20 इंचाचे अलॉय व्हिल दिले आहेत, जे आधीही मिळत होते.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

Audi Q8 e-tron ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केलं आहे. एका व्हेरियंटमध्ये 95kWH च्या क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो 340bhp ची पॉवर आणि 664Nm चा टॉर्क जनरेट करते. तर दुसरा बॅटरी पॅक 114kWH चा आहे, जो 408 bhp ची पॉवर जनरेट करते. एका चार्जमध्ये ही कार 600 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देण्यात सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची बॅटरी 170kW क्षमतेच्या डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने फक्त 31 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *