Connect with us

महाराष्ट्र

घराला स्वच्छ ठेवणारी व लक्ष्मीपूजनातील केरसुणी महागली

Published

on

नाशिक: दिवाळीत घर आणि अंगण उजळून टाकणाऱ्या पणत्या हे मांगल्याचे प्रतीक असते. त्याचप्रमाणे दिवाळीत केरसुणीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरांची स्वच्छताही जोमात सुरू आहे. केरकचरा बाहेर काढला जात असून यात महत्त्वाची भूमिका बजावणारी केरसुणी मात्र काही प्रमाणात महागली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या केरसुणीची विधिवत पूजा करण्यात येते, त्या केरसुणीचा भाव वधारला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजनात केरसुणीचा मान असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची विधीवत पूजा केली जाते. यंदा केरसुण्या 10 ते 15 टक्क्यांनी महागल्या आहेत. वाढत्या महागाईच्या दिवसात यातही दरवाढ दिसत आहे. दिवाळीच्या तयारीआधी घरोघरी खरेदी होते ती झाडूची! अर्थात स्वच्छतेच्या कामात मोलाची भूमिका बजावणारी ही वस्तू गरजेची आहे.

दिवाळीत केरसुणीच्या पूजेची प्रथा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. अधर्म, आळस, लोभ, वासना, अत्याचार, कुप्रवृत्ती अशा ठिकाणी अलक्ष्मीचे वास्तव्य असते. तिला दुर्भाग्य, अशुभ, अपयशाची देवता मानले जाते. तिचे वाहन गाढव असून, हातात झाडू हे आयुध होते. त्यामुळेच ती घरात येऊ नये म्हणून या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे.

आकारानुसार केरसुणीचे दर आहेत. 60 ते 80 रुपयात एक केरसुणी पडते. झाडू 40 रुपयात तर लहान केरसुणी 30 ते 40 रुपयांत विक्रीसाठी आहे. झाडूची जोडी घेतल्यास 100 ते 110 रुपयांत मिळते. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या लक्ष्मीमूर्तीची विधिवत पूजा केली जाते त्या लक्ष्मीच्याही मूर्ती महागल्या असून धरमपेठ येथील बाजारपेठेत त्या मूर्तीचे दर 200 ते 1500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

पूजा साहित्य महागले

काही प्रमाणात पूजेचे साहित्यही महागले आहे. बत्तासे, प्रसाद, लक्ष्मीची मूर्ती आदी साहित्यही जवळपास 5 ते 15 टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे. केरसुणी बनविण्यासाठी पानोऱ्यांच्या वापर केला जातो. कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. वाहतूक दरही वाढले आहे. केरसुणी बांधणाऱ्या कारागिरांचीही आता कमतरता असल्याने परिश्रम वाढले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात किंमत वाढवावी लागली असल्याचे कारागिरांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.