Connect with us

तंत्रज्ञान

FASTag मधून दोनदा पैसे कट झाले तर काय करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published

on

[ad_1]

मुंबई : देशात बहुतेक ठिकाणी टोल नाक्यवरती FASTag बंधन कारकर केलं आहे, ज्यामुळे लोकं FASTagच्या पर्यायाकडे वळले आहेत. FASTag च्या वापरामुळे लोकांचा वेळ वाचत आहे. कारण यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा टाळता येतात.

या सुविधेद्वारे कोणत्याही वाहनाला टोल प्लाझावर थांबायची गरज नाही आणि रोख पैसे भरण्याचीही गरज नाही. कारण FASTag लेनमधून जातना नागरीकांचे पैसे आपोआप त्यांचेया बँक अकाउंटमधून वजा केले जातात. याला सुरु करण्यासाठी सुरवातीला त्या अकाउंटमध्ये पैसे असावे लागतात. ज्यामुळे तुमच्या या अकाउंटमधील पैसे कापले जातील.

FASTag च्या वापरामुळे लोकांना त्याचा फायदा झाला मात्र लोकांचे नुकसान देखील होऊ लागले आहे. हे घेतल्यानंतर लोकांना व्यवहाराशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

अशा परिस्थितीत काय करावं हे लोकांना कळत नाही आणि अपुऱ्या माहितीमुळे लोकांचे नुकसान देखील होते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

दरम्यान, लोकांचा एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की, जर टोल प्लाझा येथे FASTag मधून डबल शुल्क कापले गेले तर काय करावे? कारण तसे होण्याची शक्यता आहे. या संदर्भात, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितले आहे की, जर दुप्पट पैसे नागरीकांकडून कापले गेले तर, ज्या बँकेकडून FASTag खरेदी केला आहे त्यांच्याच ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा लागेल.

बँक तुमची तक्रार नोंदवून घेईल आणि पडताळणीनंतर, व्यवहाराचे पैसे आपल्या FASTag खात्यावर परत केले जातील. ठरवलेल्या कालावधीत पैसे परत न मिळाल्यास तुम्ही त्वरित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता.

FASTag मध्ये व्यवहाराशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात

FASTag च्या व्यवहाराशी संबंधित आणखी कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आम्ही तुम्हाला या मोठ्या अडचणींबद्दल सांगणार आहोत.

  1. एकदा FASTag लेन ओलांडण्यासाठी दोन वेळा पैसे वजा केले जाऊ शकतात.
  2. बर्‍याच वेळा असेही घडते की, तुमच्या फास्टॅगमधून पैसे कापले जाणार नाही. तेव्हा मग तुम्हाला रोख रक्कम भरावी लागू शकते आणि मग थोड्या वेळाने एक मेसेज येऊ शकतो की,  तुमच्या FASTag मधून पैसेही वजा केले गेले आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला दोनदा पैसे द्यावे लागतील.
  3. काही वेळी निश्चित शुल्कापेक्षा जास्त पैसे देखील वजा केले जाऊ शकतात
  4. बऱ्याचदा असेही होते की, पास घेतल्यानंतर किंवा कोणतीही ऑफर मिळाल्यानंतरही FASTag मधून पैसे वजा केले जातात.

तक्रार कशी करावी?
तुमच्याकडे FASTagच्या व्यवहाराशी संबंधित तक्रार करण्याचे दोन मार्ग आहेत. सर्वप्रथम, तुम्ही ज्या बँकेकडून FASTag घेतला आहे, त्या बँकेच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर किंवा पेटीएमवर तक्रार नोंदवा. त्यांचे ग्राहक सेवा अधिकारी आपल्याला संपूर्ण माहिती देतील आणि समस्येचे निराकरण करतील.

तक्रार नोंदवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे संबंधित बँकेच्या फास्टॅग पोर्टलद्वारे, प्रत्येक बँकेने FASTagसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर तुम्हाला तुमच्या फास्टॅगशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.

FASTag जारी करणारे बँक आणि त्यांचे टोल फ्री नंबर

आईसीआईसीआई बँक – 1860-210-0104
एसबीआई बँक – 1800266-9970
इक्विटास बँक – 1800-419-1996
एक्सिस बँक – 1800-103-5577
आईडीएफसी बँक – 1800-266-9970
पेटीएम – 1800-102-6480
पंजाब नेशनल बँक – 0806-729-5310
एचडीएफसी बँक – 1800-120-1243
सिंडिकेट बँक 1800-425-0585
फेडरल बँक – 1800-266-9520
कोटक महिद्रा बँक – 1800-266-6888

[ad_2]