Connect with us

देश

जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक, 2 कॅप्टनसह चार जण हुतात्मा

Published

on

Jammu Kashmir Encounter :  जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri) आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Indian Army And Terrorist Encounter) चकमक झाली. या चकमकी दरम्यान भारतीय लष्कराच्या दोन कॅप्टनसह चार जवानांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजता लष्कराला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.

घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शोध मोहिमेदरम्यान धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या गोळीबारात दोन अधिकारी आणि दोन जवानांनी प्राण गमावले झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या शोध मोहिमेत लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह पॅराट्रूपर्सही सहभागी झाले होते. मात्र दहशतवादी घात घालून बसले होते. लष्कर त्या दहशतवाद्यांजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी लष्करावर वेगाने गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन कॅप्टन दर्जाचे अधिकारी आणि लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. तर, लष्कराचा एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले.

मागील 9 तासांहून अधिक काळ ही चकमक सुरू आहे. संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला आहे. या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचा एक कॅप्टन आणि पॅराट्रूपर्सचा दुसरा कॅप्टनने प्राणांचे बलिदान दिले आहे. तर पॅराट्रूपर्सच्या एका सार्जंटनेही प्राण गमावले आहे.

5 दिवसांपूर्वी कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मिळाले होते मोठे यश

पाच दिवसांपूर्वी कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. सैनिकांनी रॉकेट लाँचरच्या साह्याने दहशतवादी लपलेले घर उडवून दिले. लष्कराच्या कारवाईत 5  दहशतवादी ठार झाले. कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत 5 दहशतवादी मारले गेले. कारवाईबाबत एडीजीपी काश्मीर यांनी सांगितले की, घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी एक्स (ट्विटर) वरील पोस्टद्वारे सांगितले होते की, कुलगाममधील दमहल हांजी पोरा भागात गुरुवारी चकमक सुरू झाली होती. येथे सुरक्षा दलांनी कालपासून काही दहशतवाद्यांना घेरले होते. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *