Connect with us

मनोरंजन

‘आजी म्हण तिला’, 12 वर्षांनी मोठी असणाऱ्या मलायकाला बेबी म्हणालामुळे अर्जुन कपूर झाला ट्रोल

Published

on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरानं आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा केला आहे. 23 ऑक्टोबर 1973 रोजी ठाणे, महाराष्ट्र येथे जन्मलेली मलायका ही अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे, जो वयाने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तिच्या वाढदिवशी अर्जुननं तिला रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकासोबतचा स्वतःचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्यानं मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अर्जुननं, “द यिन टू माय यांग. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी. तू जशी आहेस तशी राहा, आनंदी राहा, माझी राहा.” मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अर्जुनची पोस्ट शेअर केली आणि “फक्त तुझी” असे कॅप्शन दिले.

मलायका आणि अर्जुनला अनेकदा ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी आता ही त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकऱ्यानं फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘बूढ़ी घोड़ी, लाल लगाम’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भाभी से बेबी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आईला शुभेच्छा देत आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘लाज वाटत नाही का? म्हातारी असून एका तरुणाला फसवले’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ बेबी नहीं दादी मां बोलो.’ 

जेव्हा अर्जुन ‘कॉफी विथ करण’च्या 6 व्या सीझनमध्ये चुलत बहीण सोनम कपूरसोबत आला तेव्हा अर्जुनला लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘नाही, कारण कोविडमध्ये दोन वर्षे झाली आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी कुठे जात आहे हे मला पाहायचे आहे. मी एक पॅक्टिकल व्यक्ती आहे. मी लाजत नाही. मला अधिक स्थिर व्हायचं आहे. फक्त आर्थिकच नाही. जर मी आनंदी असेल तर मी माझ्या जोडीदाराला आनंदी करू शकतो.’