Connect with us

आरोग्य

आरोग्यासाठी सर्वोत्तम भाजी : शिमला मिरची

Published

on

shimala mirchi capsicum

आपल्या आहारामध्ये भाज्यांची भूमिका खूप महत्वाची असते. नियमितपणे भाज्यांचे सेवन करणे हे उत्तम आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे आणि म्हणूनच डॉक्टर नेहमी आपणाला आहारामद्धे भाज्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला देतात.

भाजी ही तशी पाहता बऱ्याच तरुण पिढीचा नावडता पदार्थ! आजची तरुण पिढी ही भाज्या पहिल्या की नाक मुरडतात आणि सर्रास त्यांचा ओघ हा फास्ट फूड खाण्यामागे असतो. त्यामुळे भाज्यांपासून मिळणारी जिवनसत्वे ह्या तरुण पिढीला मिळत नाहीत, आणि म्हणूनच अगदी तरुणपणातच विविध आजारांना बळी बडतात.

हे पण वाचा: तुळशीची पाने कसे बरे करतील तुमचे आजार ?

आज आम्ही तुम्हाला अशाच एक भाजी बद्दल माहिती देणार आहोत, किंबहुना फोटो पाहून तुमच्या लक्षात आल असेलच, की आम्ही शिमला मिरची म्हणजेच जिला आपण भोपळा मिरची म्हणून ओळखतो, या भाजीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व सांगणार आहोत.

शिमला मिरचीला इंग्रजी मध्ये Capsicum किंवा Pepper म्हणतात, आणि हीच शिमला मिरची आपण चिकन चिल्ली, चायनिज, पिझ्झा या सारख्या पदार्थामध्ये आवडीने खातो. पण जेव्हा हीच भाजी आपल्या घरात बनवली जाते तेव्हा मात्र आपण ह्या भाजीकडे पाठ फिरवतो.

आता तुम्ही म्हणाल की, वरील पदार्थांमधून शिमला मिरचीचे सेवन होते मग ती घरीच का खाल्ली पाहिजे. हॉटेल मधले अन्नपदार्थ कितीही चविष्ट असले तरी ते आरोग्याच्या दृष्टीने किती घातक असतात हे वेगळ सांगण्याची आवश्यकता नाही.

शिमला मिरचीचे फायदे

शिमला मिरचीत मोठ्याप्रमाणात विटामीन ए, विटामीन सी, व बीटा कैरोटीन सारखे पोषक घटक असतात ही जीवनसत्वे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फार महत्वाची असतात. चला तर पाहूया शिमला मिरचीमुळे आपणाला कोण कोणते फायदे होऊ शकतात.

रोगप्रतिकरक शक्तिवाढण्यासाठी :

शिमला मिरचीमद्धे विटामीन सी मूलभूत प्रमाणात असते, आणि विटामीन सी आपली रोगप्रतिकरक शक्ति वाढवण्यासाठी खूप महत्वाचे काम करते. म्हणूनच नियमितपणे भोपाळ मिरचीचे आहारामध्ये सेवन केले तर आपली रोगप्रतिकरक शक्ति वाढवण्यास मदत होते.

अनेक आहारतज्ञांच्या मते आहारामध्ये शिमला मिरचीचे सेवन केल्यास आपला मेंदू अधिक तेजस्वी बनतो त्याचप्रमाणे मेंदू वरील ताणतणाव देखील कमी होण्यास मदत होते.

हे पण वाचा: मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!

कॅन्सरपासून बचावकरण्यासाठी:

शिमला मिरचीच्या अथवा आपल्या लाडक्या भोपळा मिरचीच्या भाजीत काही विशिष्ठ गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून रोखतात. परिणामी शिमला मिरचीच्या भजीचे नियमित सेवन करणाऱ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता ही फार कमी असते, असे आहारतज्ज्ञचे मत आहे.

जर कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगाला आपल्यापासून दूर ठेवायच असेल तर भोपळा मिरचीचे सेवन आपल्या आहारात वाढवणे आवश्यक आहे आणि म्हणूनच शिमला मिरचीची भाजी खाताना टाळा -टाळ करू नये.

पोटाच्या विकरांपासून मुक्तता:

डॉक्टर अथवा आहारतज्ञ तुम्हाला नेहमीच सल्ला देतात की पोट साफ ठेवण्यासाठी भाज्यांचे प्रमाण आहारामध्ये वाढवा आणि त्याला शिमला मिरची अपवाद नाही. शिमला मिरचीच्या नियमित सेवनाने आपली पचन क्षमता सुधारते आणि पोटांच्या विकरांपासून मुक्तता मिळते.

स्थूलपणा कमी होण्यासाठी मदत:

युवा पिढीमध्ये स्थूलपणा हमखास दिसून येतो आणि त्याला कारणीभूत आपण आपल्या आहारामध्ये कॅलरीयुक्त आहाराचे सेवन अधिक करतो. पण जर तुम्ही आहारामध्ये शिमला मिरचीच्या भाजीचा समावेश कराल तर स्थूलपणा कमी करण्यास मदत होईल कारण शिमला मिरचीच्या भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण हे खूप कमी असते परिणामी तुमचे वजन वाढण्याचा धोका दूर होतो.

शिमला मिरचीच्या सेवनाने तुम्हाला भरपूर प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. विटामीन सी सोबत विटामीन ए, अल्कालॉइड्स, टैनिन्स व फलेवानाइॅड्स भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

हे पण वाचा: जर तुम्ही सकाळी नाष्ट्याला चहा-चपाती खात असाल, तर आजच थांबवा!

जर ही माहिती तुम्हाला आडवली असेल तर खालील कमेन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा. आशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला नक्की फॉलो करा आणि जर तुम्हाला अशी कोणतीही माहिती आमच्या मार्फत प्रकाशित करायची असेल तर आम्हाला फेसबूक किंवा contact@kokanshakti.com या ईमेल आयडीवर संपर्क साधा.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *