Connect with us

आरोग्य

मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!

Published

on

ragi seeds नाचणी

नमस्कार मंडळी, कोकणशक्तिमध्ये आपणां सर्वांचे स्वागत आहे. आरोग्याच्या गुरुकिल्लीमध्ये आजआपण पहाणार आहोत नाचणीचं आपल्या आहारातील महत्व .

तस पाहिलं तर नाचणी हा पदार्थ विशेषतः कोणाला आवडत नाही, तरी सुद्धा आज या नाचणीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

नाचणी आवडो न आवडो तिचा अन्नपदार्थामध्ये समावेश करणं क्रमप्राप्त ठरले आहे.
नाचणीच्या पिकाला कमी पाऊस , काळी कसदार जमीन लागते. कोकणात पावसाळ्यात भात शेतीची लागवड झाल्यानंतर नाचणीची लागवड करतात. कोकणात तांदुळा इतकेच नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

नाचणीचे आपल्या आहारात खूप फायदे आहेत. मधुमेह झालेल्या व्यक्तिंनी जर नाचणीची भाकरी खाल्ली तर रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य रहाण्यास मदत होते.

मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते अशावेळी नाचणीमधील पॉलीफेनॉल त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. शिवाय नियमित आहारात नाचणीचे पदार्थ घेतल्यास ग्लाइसेमिक प्रतिसाद देखील कमी होतो.

वजन वाढलेल्या व्यक्तींनी पण जर भाताऐवजी नाचणीचे पदार्थ खाल्ले तर वजन कमी होण्यास मदत होते. कारण नाचणीमध्ये लोह व फायबरची मात्रा चांगली असते, आणि चरबीचे प्रमाण ही कमी असते.

आपल्याकडे साधारणता लहान बाळ चार ते पाच महिन्याचे झाले कि त्याला नाचणीच्या पिठाची खिमटी करुन भरविली जाते आणि ते खिमटी खाणारे बाळ पण गुटगुटीत होते.

कारण बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले लोह, प्रथिने, कॅल्शिअम हे घटक त्यातून मिळतात. शिवाय यामुळे बाळाची हाडे हि मजबूत होतात. लहान बाळांप्रमाणेच सहा वर्षांवरील मुलांनाही नाचणीचे पदार्थ आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवून देऊ शकतो कारण ही मुले भाकरी खाणं नक्कीच पसंद करणार नाहीत कारण नाचणीची भाकरी ही काळ्या रंगाची दिसते.

मग युट्युबच्या माध्यमातून नाचणीचा पॅन केक, नाचणीचे सूप , नाचणीच्या पिठाचे लाडू असे वेगवेगळे त्यांना आवडणारे पदार्थ करून दिले तर ती मुले ते पदार्थ आवडीने खातीलही आणि त्यांचे आरोग्यही उत्तम राहील यात शन्का नाही.

अजूनही एक महत्वाचा नाचणीचा उपयोग म्हणजे थंडीच्या दिवसात तुमच्या शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम नाचणी करते. नाचणीच्या सेवनाने शरीर उबदार रहातेच परंतु या कालावधीत शरीराला अतिरिक्त पोषणाची आवश्यकता असते. ती कसर नाचणी भरून काढते. शिवाय शरीरात स्नायूंच्या उती ही तयार करते.

तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या आहारात नाचणीचा वापर कशा कशाप्रकारे करता हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी कोकणशक्तिला फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.