आरोग्य

जर तुम्ही सकाळी नाष्ट्याला चहा-चपाती खात असाल, तर आजच थांबवा!

नमस्कार मित्रांनो कोकणशक्ति वर आपणां सर्वांचे स्वागत आहे. आरोग्य ही आपली धनसंपदा आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणं फार महत्वाचे आहे. आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या नाष्ट्याने होते. मग दुपारचे हेवी जेवण, व रात्रीचे जेवण.

पण हे घेत असताना आपण आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचा आहार आवश्यक आहे याचा कधी विचार केला आहे का ? नाही ना ?

अहो, हा विचार करायलाच आपल्याकडे वेळच नाही आहे. आज आपल जीवन घड्याळ्याच्या काट्यापेक्षाही फास्ट झालं आहे की काय असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. या सगळ्यामध्ये दिवसाची सुरुवात करतो ती सकाळच्या नाष्ट्याने.

पण काही जण तर सकाळचा नाष्टा ही न करता घरा बाहेर पडतात. तर काही रेडिमेड नाष्टा करणे पसंद करतात. तर अजूनही काही घरात सकाळच्या नाष्ट्याला गरमागरम चहा चपाती खाणेच पसंद करतात.

नक्की वाचा: होमिओपॅथी पायवाट

पण खरचं गरमा गरम चहा चपाती हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाष्टा आहे का याचा आपण कधी विचार केला आहे का ?

आहारतज्ज्ञांच्या मते सकाळचा आपण केलेला नाष्टा हा आपल्या शरीराला दिवसभराची मुबलक ऊर्जा देणारा असतो . आहारतज्ज्ञांच्या मते चहा चपाती मधून मिळणारी पोषक द्रव्ये ही फारच कमी असतात.

त्यांच्यामते दररोज सकाळी नाष्ट्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात कार्बोहायड्रेड व प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात गेले पाहिजेत. मग खरंच चहा चपाती मधून हे घटक आपल्या शरीराला मिळतात का ?

मुळीच नाही कार्बोहाड्रेड , आर्यन , कॅल्शियमची गरज चहा चपातीमधून पूर्ण होऊ शकत नाही, कारण चहा हा कॅफीनयुक्त पदार्थ असून उलट तो आपल्या शरीरात ऍसिडिटी निर्माण करतो. त्यामुळे कोणत्याही अन्नपदार्थाचे चहाबरोबर सेवन हे शरीराला नक्कीच घातक आहे.

शिवाय चपाती मधून ही कॅल्शियम, प्रोटीन हे घटक हवे त्या प्रमाणात शरीराला प्राप्त होत नाहीत. त्यामुळे चहा चपाती सरख्या नाष्ट्या मधून शरीराला कोणतीच पोषक द्रव्ये प्राप्त होत नाहीत असे आहारतज्ज्ञांचे ठाम मत आहे.

मग मित्रांनो आला ना तुमच्या मनात प्रश्न की, चहा चपाती खायची नाही तर मग सकाळच्या नाष्ट्याला खायचे तरी काय ? जरी चहा चपाती हा झटपट बनणारा नाष्ट्या असला तरी आता यापुढे तरी असा नाष्टा आपल्याला टाळला पाहिजे.

त्याच्याऐवजी कार्बोहाड्रेड , आर्यन , कॅल्शियम , प्रोटीन असे घटक असलेले अन्नपदार्थ सकाळच्या नाष्ट्या मध्ये असणे महत्वाचे आहे. यासाठी दूध चपाती, दही चपाती, अंडी, पनीर, इडली , डोसा, रव्यापासून बनलेले पदार्थांचे सेवन जर सकाळच्या नाष्ट्या मध्ये केले तर आपले आरोग्य उत्तम रहाण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही.

तर मित्रांनो दररोज तुम्ही कोणत्याप्रकारचा नाष्टा करता, हे आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर ही माहिती तुम्हांला कशी वाटली याच्यावर देखील तुमची प्रतिक्रिया आम्हाल नक्की द्या.

मला आशा आहे की ही माहिती तुम्हांला नक्कीच आवडलीच असेल. अशा प्रकारची आणखी नवनवीन माहिती मी मिळवण्यासाठी कोकणशक्तिला फेसबूक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणिंसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका.

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close