Connect with us

आरोग्य

तुळशीची पाने कसे बरे करतील तुमचे आजार ?

Published

on

Tulsi Plant

आज आपण पाहिले  तर  लहानांपासून  ते मोठयांपर्यंत  सारेच कोणत्या ना  कोणत्या आजाराने  त्रस्त  आहेत. साधी तापाची साथआलीतर एकेका  घरांमध्ये तीनचार व्यक्ती  त्याआजाराला बळी पडतात हे आजचं सत्य आहे.  यासर्वाला जबाबदारआहे  ती आपली रोगप्रतिकारक शक्ती.  एखाद्या आजाराचे विषाणू आपल्या शरीरात गेले असता पांढऱ्या  पेशी त्यांचा नायनाट करतात व संभाव्य आजारापासून आपली सुटका होते.  पण हे शक्य आहे ज्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच पुरेशा प्रमाणात पांढऱ्या पेशी आहेत.  

हे वाचा: मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!

रोगप्रतिकारकशक्ती  कशी  वाढवाल ? 

आजच्या फास्ट युगामध्ये  आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे  लक्ष  द्यायला तसा वेळही  नसतो. त्यामुळे  रोगप्रतिकारक  शक्ती बाबत  प्रश्नचिन्हच  आहे.  डॉक्टर्स आपल्याला नेहमी सांगत असतात ,सकस आहार घ्या. सहा ते आठ तास पूर्ण झोप घ्या. आहारामध्ये फळे, फळभाज्यांचा, पालेभाज्यांचा  समावेश करा. तरच आपले आरोग्य सुदृढ राहील. पण फास्ट फूडच्या युगामध्ये आपण आपल्या शरीराला काय आवश्यक आहे तिकडे लक्ष न देता आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यात धन्यता मानतो. शिवाय आता  शेतकरी सुद्धा जास्त पीक घेण्यासाठी अमाप रासायनिक खतांचा वापर करताहेत. यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आहे असं तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून यासाठी आता आपण पाहणार आहोत, तुळशीच्या पानांद्वारे रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढेल ? 

तुळशीचा उपयोग काय?

आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस अतिशय पवित्र मानली जाते ती तिच्या मध्ये असणाऱ्या विविध गुणधर्मामुळेच. आयुर्वेदिक औषधांमध्येही तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आयुर्वेद आपल्याला सांगते की विविध प्रकारच्या ८८ आजारांवर तुळस गुणकारी औषध आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते. या तुळशीला वायुनाशक वनस्पती सुद्धा म्हटले जाते. तुळशीच्या वासाने सभोवतालचे वातावरण शुद्ध व जन्तुविरहित होते. आपले फुफ्फुस तुळशीच्या पानांच्या व मंजिरीच्या वासाने अधिक कार्यक्षम होते, फुफ्फुसाला नवीन ताकद देते. हिवाळ्यांमध्ये जर तुंळशीची चार पाच पाने नियमित खाल्ली तर आपले शरीर उल्हासित व निरोगी रहाण्यास मदत होते. 

तुळशीचे आणखी काही महत्वाचे उपयोग-

 • समरणशक्ती वाढण्यासाठी तुळशीच्या चार पाच पानांचे नियमित सेवन करावे. 
 • अर्धशिशी बरी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा  आल्याच्या पानांचा दोन थेंब रस टाकावा. 
 • पोटात दुखून जुलाब होत असल्यास तुळशीची पाने चमचा भर दह्याबरोबर खाल्ल्यास बरे वाटते. 
 • मुतखडा बरा करण्यासाठी तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यामध्ये मध घालून नियमित सहा महिने सेवन केल्यास मुतखडा निघून जातो. 
 • तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्यास आपले शरीर शुद्ध होते. 
 • रोज तुळशीची चार पाच पाने अंशीपोटी चावून खाल्ल्यास पोटात जन्त होत नाहीत. 
 • तुळशीची पाने वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील तारुण्यपिटिका निघून जातात व चेहऱ्याचे सौदर्य देखील वाढण्यास मदत होते. 
 • शरीरावर एखादा मोठा चामखीळ असेल व तो काढावयाचा असल्यास त्याला नियमित तुळशीच्या पानांचा रस लावावा, कालांतराने तो बारीक होऊन निघून जाईल. 
 • सततच खोकला येत असल्यास तुळशीच्या पानांचा रस व मध याचे चाटण करावे. त्यामुळे शरीरातील कफही कमी होण्यास मदत होते. 
 • वहाणाऱ्या जखमा , व जुनाट जखमा भरून काढण्यासाठी तुळशीच्या मुळ्या बारीक वाटून त्याचा लेप लावावा. जखम लवकर बरी होते. 
 • युरीन विषयक आजार बरे करण्यासाठी रात्री तुळशीच्या बिया पाण्यात भिजत ठेवून  सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे. 
 • सर्दी ताप यावर देखील तुळशीच्या पानांचा रस उत्तम गुणकारी औषध आहे. 
 • रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस नियमित सेवन करणे केव्हाही चांगले. 

हे वाचा: ओझोनच्या थराचे छिद्र आश्चर्यकारक रित्या बंद झाले!

तर मित्रांनो अँटीबॉयटिक औषधांपेक्षा आयुर्वेदिक औषधांचा आपल्या जीवनात जास्त वापर करून आपले आयुष्य वाढवा. तेव्हा तुळशीच्या पानांचा नियमित वापर करा. या विषयी आपले मत मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी कोकणशक्तिला फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.

Continue Reading
Advertisement
1 Comment

1 Comment

 1. Pingback: आरोग्यासाठी सर्वोत्तम भाजी : शिमला मिरची ✒ कोकणशक्ति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *