Connect with us

क्रिडा

संडे हो या मंडे रोज खाईन मिसळ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल

Published

on

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला खाद्यप्रेमी असे म्हणून देखील ओळखले जाते. त्याने अनेकवेळा मुलाखती दरम्यान आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले आहे. सचिन तेंडुलकर कधी कधी स्वतः किचनमध्ये जाऊन देखील आपली आवडती डिश बनवत असतो. याबाबत अनेकदा त्याने सांगितले आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या आवडत्या डिशबद्दल खुलासा केला आहे. (Sachin tendulkar favourite dish)

सचिन तेंडुलकरने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. त्याचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. ज्यांच्यासोबत जोडून राहण्यासाठी सचिन तेंडुलकर नेहमीच व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मिसळ पाव खाताना दिसून येत आहे.(sachin tendulkar viral video)

मिसळ पाव ही सचिन तेंडुलकरची आवडती डिश आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत सचिन तेंडुलकरने लिहिले की, “रविवार असो किंवा सोमवार मी मिसळ पाव खाणारच”. त्यापुढे त्याने लिहिले की, “तुमचा आवडता नाश्ता कुठला आहे?..”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणतोय की, “महाराष्ट्राची मिसळ पाव एकच नंबर आहे.” ही गोष्ट सर्वांना माहीत आहे की, सचिन तेंडुलकर खाद्यप्रेमी आहे.

सचिनला मिसळ पावसह, वडापाव, किमा पराठा, प्रॉन मसाला आणि लस्सी देखील आवडते. खाद्यप्रेमीसह सचिन तेंडुलकर एक चांगला कूक देखील आहे. एकदा सचिन तेंडुलकरने आपल्या संघ सहकाऱ्यांसाठी वांग्याचे भरीत बनवले होते. ते सर्वांना आवडले देखील होते.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *