Connect with us

क्रिडा

हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड

Published

on

[ad_1]

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रविवारचा दिवस खास होता. दिवसभर फक्त गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याच नावाची चर्चा सुरु होती. आयपीएल 2024 साठी सर्व 10 संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय समोर आले आहेत. दिवसभराआधी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला कोणत्याही किंमतीत आपल्या संघात घ्यायच्या असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण संध्याकाळी गुजरात टायटन्सने पांड्याला संघात कायम ठेवल्याचे समोर आलं. पण दोनच तासांनी यामध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट आला. मुंबई इंडियन्सने अखेर हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले आहे.

रविवारी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने त्याच्या संघाशी संबंध तोडले आहेत. आता तो त्याच्या जुन्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. मुंबईने मोठ्या ट्रेडद्वारे पांड्याला आपल्या संघात घेतले आहे. रिटेनचा वेळ संपल्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड केले आहे. मात्र, गुजरात आणि मुंबई या दोन्ही संघांकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पांड्याला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनचा 17.5 कोटी रुपयांचा त्यागही केला आहे. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सोबत ग्रीनला ट्रेड केले आहे.

2022 मध्ये गुजरात टायटन्स हा नवीन संघ म्हणून आयपीएलमध्ये सामील झाला होता. त्यानंतर गुजरातने पांड्याला 15 कोटी रुपयांत आपल्या संघात समाविष्ट करून त्याला कर्णधार बनवले. त्यानंतर पांड्याने पहिल्याच मोसमात गुजरातला चॅम्पियन बनवले होते. याआधी पांड्या फक्त मुंबई संघाकडून खेळायचा. मुंबईला पांड्याला आपल्या संघात घ्यायचं होतं. मात्र मुंबई इंडियन्सकडे पांड्याला परत आणण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणूनच त्यांनी त्यांचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड केले आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी 11 खेळाडूंना करारमुक्त होते. त्यामुळे मुंबईकडे 15.25 कोटी रुपये आले होते. हार्दिक पांड्याला संघात समाविष्ट करण्यासाठी मुंबईला 15 कोटी रुपये मोजावे लागणार होते. तसे केले असते तर मुंबईकडे लिलावात खर्च करण्यासाठी पैसे उरणार नव्हते. यामुळे, मुंबईने ऑल-कॅश डीलमध्ये कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबईने 17.5 कोटी रुपये भरून ग्रीनला खरेदी केले होते.

शुभमन गिल होणार कर्णधार!

त्यामुळे आता गुजरात टायटन्सचा स्फोटक फलंदाज शुभमन गिल आयपीएल 2024 मध्ये संघाचे नेतृत्व करेल. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. मात्र, फ्रँचायझीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

[ad_2]