Connect with us

देश

SBI PO Recruitment 2021 : स्टेट बँकेत PO पदासाठी मेगा भरती, जाणून घ्या अर्ज कसा करायचा

Published

on

SBI PO Recruitment 2021 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँकेने  प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी 2056 जागांची जाहिरात काढली आहे. या पदासाठी उत्सुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यासाठीची पात्रता, परीक्षा पद्धत आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन तीन टप्प्यात करावं लागणार असून त्यासाठी उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. 

महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन- 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर

फेज 1 – ऑनलाईन पूर्व परीक्षा- नोव्हेंबर, डिसेंबर 2021

फेज 2 – ऑनलाईन मुख्य परीक्षा- डिसेंबर 2021

फेज 3 – मुलाखत- फेब्रुवारी 2022 चा दुसरा आणि तिसरा आठवडा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. पण मुलाखतीला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्याकडे पदवीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. 

वयोमर्यादा– उमेदवाराचे वय हे 21 ते 30 वर्षे इतकं असावं. ओबीसी प्रवर्गासाठी अतिरिक्त तीन वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी अतिरिक्त पाच वर्षांची अतिरिक्त वयोमर्यादा तसेच दिव्यांग प्रवर्गासाठी अतिरिक्त 15 वर्षाची वयोमर्यादा आहे. 

असा करा अर्ज-
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी एसबीआयच्या https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या वेबसाईटला भेट द्यावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.