Connect with us

देश

Income Tax Department Recruitment 2021 आयकर विभागात क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती, 31 डिसेंबर अंतिम तारीख

Published

on

[ad_1]

Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. आयकर विभागानं क्रीडा कोट्याअंतर्गत कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindia.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

याशिवाय, उमेदवार थेट अधिकृत लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच तुम्ही या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचनाही पाहू शकतात. याअंतर्गत एकूण 7 पदांची भरती केली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

रिक्त जागा-

कर सहाय्यक – 5 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ – 2 पदे

पात्रता-

कर सहाय्यक– 

कर सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे. तसेच उमेदवाराचा डेटा एंट्रीचा वेग 8000 डिप्रेशन प्रति तास असणे आवश्यक आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ– 

मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट-

कर सहाय्यक – 18 ते 27 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ- 18 ते 25 वर्षे

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *