Connect with us

देश

काँग्रेस आमदाराचे मोदींना पत्र, म्हणाले 500 आणि 2000 हजारच्या नोटांवरुन गांधींचा फोटो काढून टाका!

Published

on

जयपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री भरत सिंह (Bharat Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. कोटा ग्रामीणच्या सांगोडमधील काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना  (PM Narendra Modi) एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरुन महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो काढून टाकण्याची मागणी केली आहे.

भरत सिंह यांनी पत्रात लिहिले की महात्मा गांधी हे सत्याचे प्रतीक आहेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या Reserve Bank of India) 500 आणि 2000 च्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र आहे. त्याचवेळी, त्यांनी सांगितले की या नोटा लाचखोरीच्या व्यवहारासाठी वापरल्या जातात, म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला की 500 आणि 2000 च्या नोटांवरुन गांधीजींचा फोटो काढून टाकल्यानंतर फक्त त्यांचा चष्मा किंवा अशोकचक्राचा फोटो लावावा.

देशात भ्रष्टाचार फोफावतोय

माजी मंत्री भरत सिंह यांनी पत्रात लिहिले आहे की 75 वर्षात देश आणि समाजात भ्रष्टाचार (Corruption) मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एसीबी (ACB) विभाग राजस्थानमध्ये आपले काम करत आहे. तसेच, जानेवारी 2019 ते डिसेंबर 31, 2020 या मागील 2 वर्षात राज्यात 616 गुन्हे नोंदवले गेले आहेत.

500 आणि 2000 च्या नोटांचा गैरवापर

एसीबी विभागाच्या ट्रपमध्ये लाचेची रक्कम 500 आणि 2000 च्या नोटांमध्ये वापरली जात असल्याचे समोर आले आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोसह 500 आणि 2000 च्या मोठ्या नोटा बार, मद्य पार्टी आणि इतर पार्ट्यांमध्ये नाचण्या गाण्याऱ्यांवर उडवले जातात.

छोट्या नोटा गरीबांसाठी उपयुक्त आहेत

या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापला गेला आहे आणि त्यामुळे गांधीजींच्या सन्मानाला धक्का पोहचत आहे.. त्याचवेळी भरत सिंह यांनी लिहिले की गांधींचा फोटो फक्त 5, 10, 20, 50, 100 आणि 200 च्या नोटांवर छापला पाहिजे. या छोट्या नोटांबाबत ते म्हणाले की, या नोटा गरिबांसाठी उपयुक्त आहेत.