देश
PM Modi Speech Highlights : लसीकरण मोहिमेत व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही : मोदी
Published
2 years agoon
By
KokanshaktiPM Modi To Address Nation : 100 कोटी कोरोना लसीकरणाचं कठीण पण असाधारण लक्ष्य पार केलं. या पाठीमागे देशातील 130 कोटी जनतेचं सहकार्य आणि कर्तव्यशक्ती आहे. यासाठी सर्व भारतीयांचं अभिनंदन करतो. 100 कोटी लसीकरण फक्त ही फक्त संख्या नाही, देशातील जनतेच्या सामर्थ्याचं प्रतिबंब आहे. नवीन भारताची ही ताकद आहे. ज्या वेगानं आपण 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला, त्याचं जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करण्यात आलं. यामध्ये व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. जे बड्या देशांना जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश आल्याचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना जगभरातील इतर देशांसोबत करत आहे. भारताने ज्या वेगानं 100 कोटींचा आकडा पार केला त्याचं कौतुकही होत आहे. हे सर्व सुरु असताना आपण सुरुवात कुठून केली हे विसरत आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीला भारताला लस मिळेल का? भारत किती जणांचं लसीकरण करु शकतो? भारत कोरोना महामारीला थोपवू शकतो का? यासारख्या सर्व प्रश्नांना 100 कोटी लसीकरण उत्तर देत आहे.
100 वर्षानंतर आलेल्या सर्वात मोठ्या महामारीनंतर भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या महामारीचा भारत कसा सामना करणार? इतर देशाकडून लस खरेदी करण्यासाठी भारताकडे पैसे येमार कुठून? भारताला लस कधी मिळणार? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं 100 कोटी लसीकरण हे आहे. सर्वांना सोबत घेऊन मोफत लसीकरणाची मोहीम सुरु केली. गरीब-श्रीमंत, गाव-शहर असा महामारी भेदभाव करत नाही.
त्यामुळे लसीकरणातही भेदभाव नाही. त्यामुळे लसीकरणात व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही, असे मोदी म्हणाले. भारतासारख्या लोकशाही देशात कोरोनासोबत लढणं कठीण होईल, असं महामारीच्या सुरुवातीला म्हटलं जातं होतं. भारतातील लोकांकडे संयम आणि शिस्त आहे का? पण आपण या सर्वांना लसीकरणातून उत्तर दिलं आहे. आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ आहे, असेही ते म्हणाले.
You may like
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी काँग्रेस आणि भाजपकडून व्हिप जारी
पंतप्रधानांच्या उपस्थितीत गोवा-महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक;लोकसभा निवडणुकीवर उद्या खलबतं
10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत, CBSE अभ्यासक्रमात होणार बदल; पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा
सेमीकंडक्टर प्लांटसाठी भारत सरकार करणार 50 टक्क्यांची आर्थिक मदत
निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार
COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी