कथाब्लॉगसाहित्य

एक प्रार्थना!

माझ्या जीवनामध्ये मी वैयक्तिकरित्या जेवढ्या प्रार्थना म्हटल्या असतील, वाचल्या असतील त्यात सर्वच अतिशय उच्च दर्जाच्या आणि जीवनाचे महान तत्वज्ञान, सार व्यक्त करणार्‍या आहेत. त्यांच्या थोर विचारांच्या मोठेपणाची कुणीही तुलना करू शकत नाही. प्रत्येक विचार हा स्वतंत्र व परिस्थितीनुरूप, त्याचे महत्त्व हे जास्त चमकदार होताना दिसते. कोणता विचारा श्रेष्ठ अप्रतिम ठरविणे केवळ अशक्य असते. सर्व सुभाषितांचे आपल्या परी वेगळेच महत्त्व असते.

वरील सुभाषित जीवनाचे एक अप्रतिम तत्त्वज्ञान आहे. परमेश्वराच्या महान शक्ती समोर लीन होऊन प्रत्येकजण त्याच्यापुढे याचना करतो. जर त्याला काही मागावयाचे असेल व त्याची कृपादृष्टी हवी असेल तर वरील सुभाषितानमधले तत्वज्ञान, विचार त्या परमेश्वराला मागणे व मिळवणे यासारखे भाग्य दुसरे असू शकणार नाही. एक अप्रतिम म्हणून त्याची गणना करता येईल.

जीवनातल्या महान यशाचे गमक ज्यात दडले आहे अशी एक प्रार्थना आहे. देणारा जर सर्वशक्तिमान असेल तर मागणार पण बुद्धिमान असायला हवा. जीवनाच्या साधनाचे सार जर मनाच्या शांती मध्ये व्यक्त होत असेल तर प्रत्येकाने मनःशांतीसाठी प्रार्थना करावी. अशात मनाची मुख्य कारणे म्हणजे अविचार, चुकीचे विचार, चुकीच्या भावना, माणसाला नेहमी चंचल बनवितात. त्याचे मन अस्थिर करतात आणि मग त्या गैरसमजामूळे निर्माण होणारे वातावरण दूषित होऊन जाते. हे दूषित होणारे वातावरण निवडण्यास बराच काळ जातो.

प्रत्येक वेळी निराळे विचार, गैरसमज, चुकीच्या पायावर आधारलेल्या कल्पना आणि त्याच्या मुळे होणारे वाईट परिणाम संपूर्ण जीवनाच्या चक्राला चुकीची दिशा देत राहतात. सारे जीवन दुःखमय होऊन जाते. ह्याला जर कोणी जबाबदार असेल तर ते आपण स्वतः, आपले चुकीचे समज. परंतु आपण चक्क दुसऱ्यावर किंवा वेळ पडल्यास परमेश्वराला देखील त्याचा दोष लावतो. वरील प्रार्थनेचा गाभा नेमके हेच तुमच्या बुद्धीला पटवून देऊ इच्छितो की आपण कुठे चुकतो आणि आपली चुक कोणती.

आपण त्याच्याकडे कोणती दया याचना करावी व त्याला काय मागावे की जेणेकरून आपले जीवन सुकर होईल असा एक अनुभव आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मानाने मान्य करतो. तेव्हा ती करताना मान्यतेच्या प्रवाहामुळे कोणतीही भावना उचल खात नाही. कोणताही विरोध, कोणताही तणाव मनावर येत नाही. आपण ते कार्य सहजतेने करू लागतो आपण ते कार्य सहजतेने करू लागतो. कारण त्याच्यासाठी ते वातावरण आपण पूर्वी निर्माण केलेले असते.

ज्याची पूर्वपीठिका मान्य केलेली असते आणि ती देखील स्वतःच्या आंतरिक प्रेरणेने, मग नंतर त्या विचारांना विरोध करण्याचे प्रयोजनच रहात नाही. मात्र जर तेच काम करायचे एखादा विचार कोणीतरी बळजबरीने पटवून दिलेला असेल किंवा कोणत्यातरी तणाव पूर्वक परिस्थितीने मान्य केला गेला असेल तर ते काम करताना, तो विचार मान्य करताना मन सदैव असतील राहते.

कदाचित काम पूर्ण केले जाईल परंतु मनाची चंचलता नेहमी त्रास देणारी असेल. हे मात्र उत्स्फूर्त किंवा मानास एकदम मान्य असलेल्या विचारांच्या बाबतीत होणार नाही. कित्येक महान गोष्टी, महान कष्ट, आर्थिक अडचणी, इत्यादी आपण बघतो व त्या करताना कोणीतरी सदैव धडपडत असतो.

त्यावेळी तो सोशीत असलेल्या त्रासाचा किंवा त्याचा मुळीच विचार करत नाही. केवळ हे त्याने स्वतः ने ठरविले असते म्हणून. हा त्याचा आत्म निर्णय म्हणजेच त्याला आलेला आतला आवाज जो केवळ परमेश्वरी असतो. यामध्ये त्याच्या होणाऱ्या परिणामाची कल्पना नसते. तरीदेखील तो विचार उत्स्फूर्त असल्यामुळे मान्य झालेला असतो.

थोडक्यात म्हणजे वरील प्रार्थने मधला मुख्य विचार हा की आम्हाला प्रेरणा देणे. विचार मान्य करण्याची शक्ती दे. तो विचार आमचा ठरू देत. अंतकरणातून मान्य झालेला असावा म्हणजे त्याविषयी गैरसमज, तनाव, खंत वाटणार नाही. वरच्या सुभाषितांमध्ये तीन भाग पडलेले आहेत. पहिला भाग फारच महत्त्वाचा आहे.

जीवनाच्या प्रवाहामध्ये वहात जाताना कित्येक गोष्टी अशा येतात की ज्या माणसाच्या किंवा आजच्या अस्तित्वात असलेल्या विज्ञान शक्तीच्या आवाक्याच्या बाहेर असतात. त्यावर आत्तरी उपाय दिसून येत नाही. अशा बाबींना केवळ परमेश्वरी इच्छा म्हणून सर्वांना मान्य करावयास हवे.

त्या महान निसर्ग निर्मात्याच्या शक्तीपुढे आमच्या इच्छेचा प्रश्नच निर्माण होत नाही. ती गोष्ट केवळ त्याच्या मर्जीने झाली व तिचा आनंदाने हसत समाधानाने स्वीकार करणे हेच आमच्या जवळ उरते. मनाचा कसलाही संकोच न बाळगता कोणतीही खंत न ठेवता अशा नैसर्गिक घटनांना सामोरे गेले तर मनाची चंचलता निश्चित कमी होईल दुःख वाट्याला येणार नाही.

तुमचे आई-वडील ठरवणे तुमच्या हाती आहे काय? मुळीच नाही, ती नैसर्गिक ईश्वरी बाब आहे आणि जसे असतील, जे कोणी असतील त्यांना कोणते ते अन्नदाते आहेत हे मान्य करावेच लागते. ते तुम्हाला मुलगा अथवा मुलगी जे कोणी होईल ते केवळ निसर्ग इच्छा म्हणून मान्य करावेच लागेल ना? मग त्यासाठी अट्टाहास का करावा?

परंतु दुर्दैवाने हे दिसते की मनुष्य केव्हा केव्हा विचारावर केवळ त्वरित नाही तर निराश पूर्ण असे वातावरण करतो. कुणालातरी यासाठी जिम्मेदार ठरवतो आणि संतापून जाऊन विक्षिप्त वागतो. सार्‍या घराचे वातावरण दुषित करतो. नको असलेले अपत्य म्हणून त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. केव्हा केव्हा निराशा टाळण्यासाठी नशेचा, व्यसनाचा आधार घेत जातो.

या सर्व दुष्टचक्राचे एकच कारण म्हणजे झालेले अपत्य आपल्या मनाविरुद्ध झालेले आहे. खरे म्हणजे ही परिस्थिती माणसाच्या आवाक्याबाहेरची आहे व तरीदेखील तो ते मान्य करीत नाही आणि त्यांना सामोरा जात नाही. आपला जन्म एखाद्या गर्भश्रीमंत त्याच्या घरी व्हावा अथवा एखाद्या अत्यंत गरीब मजुराच्या घरी व्हावा ही गोष्ट मानवाच्या हातची आहे काय?

श्रीमंतीचा नका किंवा गरिबीचा फडकला त्या दोन जन्मता तुमच्या नशिबी येणे हे आपण ठरवू शकत नाही. परंतु प्राप्त परिस्थितीत गरीबीला दोष नदेत राहणारे महाभाग सदैव दुःखी वातावरणात वावरताना दिसतात.

कोणता आपला धर्म असावा, कोणते आपले जन्मस्थान असावे, णि अशा तर्‍हेच्या बऱ्याच गोष्टींची यादी करता येईल तिच्या ठिकाणी माणसांची सत्ता मुळीच चालत नाही. फक्त ईश्वरी इच्छा किंवा प्रारब्ध म्हणता येईल. परंतु कित्येक या बाबी अशा आहेत की बरेच जण याची जाणीव करीत नसतात.

ते फक्त इतरांना जबाबदार धरतात आणि त्याच्या ओघाने सर्व वातावरण दूषित करतात. वंशपरंपरेने आपले गुणधर्म, काही आजार जसे मधुमेह, दमा, रक्तदाब, संधिवात, इत्यादी हे सारे रक्ताच्या नात्यांमध्ये निर्माण होण्याची खूपच शक्यता असते.

मग जर ते नैसर्गिक आहेत. त्यामागे कुणी जिम्मेदार नाही ही आणि अशा गोष्टी आपल्या नशिबी आल्या तर त्यांना मान्य करणे आपल्या विचारांना त्या सहमत करणे ही शहाणपणाचे ठरणार नाही का? परंतु अशा गोष्टी सुद्धा कित्येक जण मान्य करतात.

त्याचे मन त्या परिस्थितीला समजून घेण्यास तयार होत नाही. ते मानसिक, वैचारिक संघर्ष करतात आणि सदैव दुःखाच्या छायेत राहतात. याला मुख्य कारण त्यांचे अविचार, गैरसमज आणि म्हणूनच प्रार्थनेच्या पहिल्या भागात विनंती केली आहे की, हे देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता दे.

खरे जर कोणती दया परमेश्वराकडून अपेक्षित करावयाची असेल तर प्रार्थनेतील हा पहिला भाग अत्यंत महत्त्वाचा व तत्वज्ञान यांनी भरलेला आहे. गैरसमजामुळे जीवन अस्वस्थ व दुखी करणारे कारणच मुळात नष्ट व्हावे हेच तुम्ही ईश्वराला मागत आहात. आणि त्याची कृपा झाल्यास जीवन सुखावह होण्याची त्याची खूप मदत होईल.

प्रार्थनेचा दुसरा भाग तर अप्रतिम आहे यात शंकाच नाही. माणसाच्या सर्वांगीण परंतु अतिशय योग्य अशा प्रयत्नांना यश देण्यासाठी धैर्य व शक्‍ती मिळावी हा त्या प्रार्थने मधला महत्त्वाचा आहे.

सर्वसामान्य मनुष्य हा सदैव परिस्थितीचा गुलाम राहत गेला आहे. ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली त्याच प्रमाणात तो वहात गेला. थोडीशी धडपड केली असेल परंतु शेवट परिस्थितीसमोर हात दोन होऊन तो तिच्याशी एकरूप झाला. हे सर्वसाधारण घडून येत असल्याचे दिसते. असाधारण व्यक्ती आपल्या बुद्धीने ,चातुर्याने आणि निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून आपले मार्ग आपणच शोधून काढण्यात यशस्वी होतात.

प्रत्येक व्यक्तीची सभोवताली असणाऱ्या सर्व दृश्य व अदृश्य वस्तू तसेच अवतीभवती फिरणारी माणसे सतत त्या व्यक्तिमत्त्वावर निरनिराळे परिणाम करत असतात. जणूकाही त्यांच्यामधून निघणाऱ्या वेगवेगळ्या धाग्यामध्ये हा व्यक्ती गुरफटून जात असतो. यालाच हवे तर परिस्थिती म्हणा. या धाग्याच्या कोणत्या मधून स्वतःची प्रत्येकजण सदैव सोडवणूक करीत राहतो. आणि दुसऱ्या क्षणाला पुन्हा वेगळे धागे, वेगळा गुंता त्याला आवरण्याचा प्रयत्न होत असतो.

याला जीवनाचा प्रवाह म्हणता येईल. या प्रवाहात पोहणे तर आलेत त्याला पर्याय नाही. परंतु हे पाहणे चालू असताना व्यवस्थित सहीसलामत तरुण जाणे, काठाला लागणे हीच उद्दिष्ट असते. परंतु काही भाग त्यात गटांगळ्या खात, डुबक्या घेत त्रासात पोहण्याच्या क्रियेला साथ देतात.

अर्थक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करून जीवन जेवढे सुकर करता येईल तेवढे करून निभावून जातात. नेमका याच गोष्टीचा विचार व्हावयास हवा कि ची म्हणून परिस्थिती स्वतःभोवती निर्माण होतील धैर्याने तोंड देऊन तिचा हसत-खेळत सामना करणे.

म्हणूनच जरी तुम्ही मनाशी ठरवले की मी कोणत्याही परिस्थितीशी झगडा देऊ शकतो, त्याच वेळी ते विसरता कामा नये की त्या सर्वशक्तिमान, दयावान परमेश्वराचे तुम्हाला अदृष्य असे सहाय्य अपेक्षित असते. तेच आपण त्याच्या चरणी लीन होऊन मागतो की मला धैर्य दे, शक्ती दे.

निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे सर्व साधारण समजण्याच्या व सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून दोन भाग तयार करता येतात. एक पूर्वी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक अथवा परमेश्वरी घटना की ची सर्वार्थाने त्याच्या महान शक्ती निर्माण केलेली असते. माणसाच्या शक्‍तीचा तेथे मुळात शिरकाव होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही हे मान्य करतो. व काहीही कुरकुर न करता तिच्यासमोर नतमस्तक होतो.

दुसरी बाजू ही अशी परिस्थिती आहे की जिला हवे तर मानव निर्मिती कमी गुंतागुंतीची असते. अर्थात सर्व घटना या ईश्वरनिर्मित असतात परंतु दुसऱ्या प्रतीच्या घटनांची सोडवणूक मनुष्य आपल्या स्वतःच्या बळावर धैर्याने करू शकतो आणि योग्य प्रयत्नानंतर त्याला यश पण येऊ शकते त्याच वेळी त्याला जर कसली गरज असेल तर ती ईश्वराकडून धैर्य, शक्ती मिळण्याची की ज्या योगाने तो त्या परिस्थितीला तोंड देऊ शकेल.

आपली आई कदाचित आंधळी असू शकते, वडील पांगळे असतील व्यंग असलेल्या पालकांच्या घरी आपला जन्म व्हावा ही कुणाच्या हातची बाब नव्हे. नैसर्गिक निर्णय शक्ती आहे. परंतु त्यात आंधळ्या आईला दृष्टी मिळवून देण्यासाठी अथवा पांगळ्या वडिलांना कृत्रिम अवयवांच्या सहायाने चांदणे करणे हे निश्चित आमच्या हातचे आहे.

वरील प्रार्थनेचा पहिला व दुसरा भाग जर व्यवस्थित समजला व अंगिकारला तर जीवनामध्ये जवळजवळ सर्वच प्रश्न सोडविताना कुठली खंत न वाटता समाधान मिळेल आणि मनाची शांती हेच खऱ्या अर्थाने जीवनाचे सार आहे. प्रार्थनेमधला तिसरा व अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रार्थनेमधला पहिला व दुसरा आशय समजून त्या मधला फरक अथवा भेद जाण्याची बुद्धी, ज्ञान मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नसता पूर्ण प्रार्थना अपुरी राहिली. आम्ही मान्य केले की ते करू शकत नाही. ती बाब आम्ही स्वीकृत करणार व खंत बाळगणार नाही. जी गोष्ट आम्ही करू शकतो, ती हिमतीने करून यश मिळणार आणि त्यासाठी परमेश्वराकडे धैर्य मागणार, शक्ती मागणार.

परंतु प्रश्न पडतो की कोणती गोष्ट करण्याचे आमच्या आवाक्यात आहे व कोणती परिस्थिती आवाक्याबाहेरची आहे हे समजण्याची. कित्येक प्रसंग असे येतात की यावेळी निर्णय घेणे केवळ अशक्य होते आणि जीवनात यश हे तुमच्या निर्णय शक्तीवर अवलंबून असते. या ठिकाणी नेमके आपण त्या ईश्वराकडे निर्णय घेण्याचे अर्थात ती गोष्ट करू शकतो वा करू शकत नाही हा भेद समजण्याचे ज्ञान मागतो.

याचा अर्थच आम्ही आमच्या योग्यतेनुसार, क्षमतेनुसार कोणते कार्य हाती घ्यावी हे महत्त्वाचे ठरते. ह्याच ठिकाणी तिसऱ्या भागामधली निर्णय शक्ती मिळवण्याची प्रार्थना अंतर्भूत आहे.

जर घटना ढोबळमानाने स्पष्ट तर सर्वसामान्य माणूस त्यावर सहजतेने निर्णय घेऊ शकतो कि ती ती गोष्ट करू शकतो वा ती अशक्य आहे. परंतु केव्हा केव्हा निर्णय घेणे केवळ अशक्य होऊन जाते आणि अशा परिस्थितीमध्ये घेतलेले निर्णय जीवनात आनंद आणतील अथवा दुःखाच्या खाई मध्ये लुटून देतील.

स्वतःच्या मुलाला अथवा आईला जर एखादा असाध्य रोग जडला असेल प्रथम त्यासाठी जो उपचार शक्य असेल तो केला जातो. स्वतःची सर्व शारीरिक व आर्थिक शक्ती त्यांच्या उपचारासाठी खर्च केली जाते. परंतु शेवटी त्या रोगाच्या असाध्य पण आकडे बघून माणसाला हतबल होण्याखेरीज गत्यंतर राहत नाही. त्याला हे मान्य करणे भागच पडते की त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांच्या मर्यादा ह्या ठरलेल्या आहेत. आणि तो त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाऊ शकत नाही.

थोडक्यात अशा प्रकारच्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये किती काळ चालू ठेवावे व जे झाले ते झाले म्हणून दुःखी वातावरण पूर्ण सोडून देऊन जीवनाला वेगळा वैचारिक पातळीवर समाधानाच्या पायरीवर आणून ठेवणे हेच समर्थकपणाचे नव्हे काय?

शक्य आणि अशक्य ते मधला भेद जाण्याची बुद्धी, शहाणपण माणसाला मिळवण्याची अत्यंत आवश्यकता आहे, आणि प्रार्थनेचा हा तिसरा भाग आहे. अर्थाने जर विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक घटना ह्या केवळ ह्याच दोन चाकावर चालत असतात. सुजान माणसे त्यातला बी तत्परतेने जाणून घेतात आणि आपला जीवन गाडा सुरळीत चालू ठेवतात.

सर्वसामान्यांसाठी ही प्रार्थना अप्रतिम व जीवनाला समतोल मार्गाने समाधानकारक ठेवणारी असली तरी ह्या प्रश्नाचा आशय व्यसनाधीन व्यक्तींसाठी जास्त महत्त्वाचा असलेला जाणवतो व्यसनाच्या दुर्दैवी चक्रांमध्ये अडकलेला माणूस आपली विचारशक्ती निर्णयक्षमता गमावून बसला असतो.

दुखाच्या चक्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला ही दोन्ही गोष्टी नशिबी येतातच. जेव्हा माणसाला भोगावे लागते त्यावेळी त्या परिस्थितीमधून तो आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो व हे सारे नैसर्गिक आहे. प्रार्थनेमध्येच सांगितल्याप्रमाणे काही दुःख माणसाला टाळता येत नाहीत. त्यांना विचारांच्या शक्तीने मान्यता देऊन तेथील करणे अथवा आलेल्या दुःखमय संकटांना फोन देऊन तिच्यावर मात करणे हे दोन पर्याय व्यक्तीसमोर असतात.

सामंजस वृत्तीने अशा परिस्थितीला सामोरे जाता येते. परंतू व्यसनाधीन व्यक्तींच्या बाबतीत अनुभव निराळा आलेला दिसून येतो. निर्माण झालेली परिस्थिती व विचाराने सोडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तिला कोणीतरी जिम्मेदार ठरवून स्वतःच्या नशिबाला सारखा दोष देत राहतो आणि त्या संकटापासून आपली सुटका केव्हा होणार नाही ही भीती तो मनामध्ये पूर्णपणे बिंबवतो.

रासायनिक पदार्थ हे मेंदूला व शरीरावर परिणाम करणारे आणि आनंदाचा भास निर्माण करणारे असतात. खरे म्हणजे हा त्यांचा परिणाम फसवा क्षणिक असतो. तरीदेखील त्या मृगजळा पाठीमागे लोक धावतात. आणि हास्यास्पद कारण दिले जाते की आमच्या मागे एवढी दुखणे का यावीत. हे आम्हाला सहन न होणारी आहेत.

आम्ही मदमस्त राहून भाऊशी मध्ये हे सारी अप्रिय परिस्थिती विसरू इच्छितो. याच विचारांनी ते लोक मादक पदार्थांचा आसरा घेतात. ते अत्यंत चुकीच्या व घातक अशा मार्गाचा अवलंब करतात. त्यांच्याभोवती निर्माण झालेली परिस्थिती ते बदलू शकत नाही. परंतु क्षणिक फसव्या सुटकेच्या आहारी जाऊन मादक पदार्थाच्या अधीन जातात.

व्यसना सत्तांचे मादक पदार्थांचे आकर्षण सुरुवातीला सुखा वाटणारे असले तरी ते संपूर्ण जीवनामध्ये दुःखद निर्माण करते. मूळ प्रार्थनेमध्ये तत्वज्ञान अंगिकारली तर दुःखाचा भार हलका करता येणार नाही का? हे एक महान सत्य आहे, ह्या प्रार्थनेच्या तत्त्वज्ञानाने माणसाचे दुःख शितल होऊ शकते.

मादक पदार्थांचा पेक्षा प्रार्थने मधला कायम स्वरूपाचा विचार प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीने अंगीकारावा, समजून घ्यावा आणि त्या महान ईश्वराला सुबुद्धी देण्याची विनंती करावी. प्रत्येक व्यक्तींनी, केवळ व्यसनाधीन नव्हे, ही उच्चदर्जाची प्रार्थना नियमित म्हणावी आणि परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे.

डॉ. भगवान नागपूरकर

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close