• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • News

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    how to earn from youtube

    YouTube पासून कमाई कशी होते?

    homi bhabha

    भारतीय अणुशक्तीचे उदगाते डॉ. होमी जहांगीर भाभा !

    Online Earning

    Online पैसे कसे कमवायचे?

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • News

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    how to earn from youtube

    YouTube पासून कमाई कशी होते?

    homi bhabha

    भारतीय अणुशक्तीचे उदगाते डॉ. होमी जहांगीर भाभा !

    Online Earning

    Online पैसे कसे कमवायचे?

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ब्लॉग

पर्यावरण ऱ्हासाची करणे आणि आपली जबाबदारी

Kokanshakti by Kokanshakti
10 May 2020
in ब्लॉग
2
environment and our responsibility
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आपल्या आसपासच्या सजीव व निर्जीव यांचा समूह म्हणजे पर्यावरण. पृथ्वीवरील ठराविक भू-भागाशी संबंधित असलेली परिस्थितीमधील स्थिती म्हणजे पर्यावरण. या पर्यावरण विश्वाची निर्मिती पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पाच तत्त्वांनी झालेली आहे. या पाच तत्त्वांनी नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण झाले आहे तो निसर्ग आणि निर्माण झालेले सुरळीत चालावे म्हणून या निसर्गाच्या अंतर्गत जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण.

या पर्यावरणीय रचनेमध्ये प्रत्येक घटक म्हणजे दगड, माती, धूळ, हवा, पाऊस, पाणी, बर्फ, खनिज आणि सूर्यप्रकाश आधी अजैविक घटक आणि कोट्यावधी सूक्ष्मजंतू आणि वनस्पती सारखे जैविक घटक एखाद्या कोळ्याच्या जाळीतील प्रत्येक धाग्यासारखे एकमेकांशी गुंतलेले आहेत.

या पर्यावरणीय रचनेमध्ये विविधता आहे, चैतन्य आहे, सौंदर्य आहे. सजीवांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, पण त्यासाठी प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार टिकून राहण्याचा अधिकार/वावही आहे. अशा या रंग रूप आकार आणि गुणांमध्ये कमालीचे वैविध्य बाळगणार्‍या पर्यावरणीय रचनेचा मानवप्राणी ही एक भाग आहे. या सर्व जणांची प्रेरणा एकच असते ती म्हणजे आपले वैशिष्ट्य कायम राखत सृष्टीचा एक भाग बनून राहणे. म्हणूनच ही रचना गुंतागुंतीची व नाजूक असली तरी अखंड राहते. अर्थात यास ज्वालामुखी, भूकंप, सुनामी लाटा, पूर इत्यादी नैसर्गिक उलथापालथ अपवाद ठरते.

इथपर्यंत सर्व घडामोडी मानव या पर्यावरणीय रचनेचा एक भाग आहे, ते मान्य असे तोवर संतुलित असतात. त्याक्षणी माणूस स्वतःला या रचनेतून बाजूला काढून तिचा मालक म्हणून वापर करू लागतो, तेव्हा त्या रचनेत बदल होऊ लागतात. तसेच जेव्हा माणूस तिचा गैरवापर करु लागतो, तेव्हा त्या रचनेत बिघाड होऊ लागतो.

आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये किंवा पर्यावरणामध्ये आज दिसणारे बिघाड हे मानवी समाजाने वापर आणि गैरवापर यामधील सीमारेषा पुसून टाकल्यामुळे निर्माण झाले आहेत. ऊर्जेचा अमर्याद वापर, शुद्ध पाण्याची उधळपट्टी, कारखाने व वाहतुकीमुळे वातावरणातील कार्बन, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी विषारी वायूंचे वाढते प्रमाण ते शोषून घेणाऱ्या वृक्षांची कमतरता आणि रस्ता रुंदीकरणासाठी चाललेली प्रचंड वृक्षतोड, कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधी अशा कित्येक गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने एका सार्वत्रिक विनाशाची प्रतिकेच आहेत.

निव्वळ उपभोग, देणे काहीच नाही. एका विचित्र संस्कृतीची शहरांमधून होणारी जोपासना भविष्यातील पर्यावरणीय समस्यांचे मुलभूत कारण ठरणार आहे. वीज-पाणी, लाकूड, कागद, सिमेंट, माती, वाळू, दगड, डांबर, पेट्रोल-डिझेल, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, प्लास्टिक, थर्माकोल इत्यादी बाबी अशाश्वत पद्धतीने किंवा उद्यासाठी शिल्लक राहतील किंवा नाही, याची तमा न बाळगता तसेच त्यांच्या वापरातून होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता न केल्यामुळे एक प्रकारची सामाजिक आर्थिक अराजकताच निर्माण होईल.

मानवाच्या गैर व्यवस्थेमुळे निसर्गनिर्मित गोष्टींचा ऱ्हास होणे हाच पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे. याचा सर्वांगीण विचार करून आपण वेळीच सावध होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारण आपण सविस्तर पणे पाहू आणि उपाययोजनांचा विचार करू.

आज मनुष्यप्राण्याने प्रगती साध्य करण्याच्या अपेक्षेने वृक्षतोड करून, विषारी द्रव्य पाण्यात सोडून विषारी वायू हवेत सोडून, विघटन होणारे प्लास्टिक यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी केलेली आहे. पर्यावरण कोसळले तर मनुष्यप्राणी जिवंत राहू नाही शकणार ही वस्तुस्थिती तो विसरला आहे.

अतिक्रमण, दुर्लक्ष, प्रमाणाबाहेर चराई, वनवे, चुकीच्या वनस्पती प्रकारांची लागवड अशाप्रकारे गवताळ प्रदेशांचा गैरवापर करण्यात आलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून चित्ता हा वन्य प्राणी नष्ट होण्यात झाला आहे. त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय पशुपालनाच्या स्वरूपावर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसतो.

पाणी आणि जमीन मिळवून आपले पर्यावरण बनते. जो पर्यंत हवेच्या रचनेत बदल होत नाहीत तोपर्यंत ती हवा शुद्ध असते. ऑक्सिजनची पातळी कमी झाली किंवा तीव्र वायू वातावरणात मिसळले किंवा तीव्र वायू वातावरणात मिसळले गेले तर हवा प्रदूषित झाली असे म्हणतात.

तंत्रज्ञानाचा वापर समाजामध्ये जासा जसा वाढत चालला आहे, तसा त्यातून निर्माण होणाऱ्या दुय्यम पदार्थांमुळे हवा अधिक विषारी होत चालली आहे. अनेक कारखान्यांची धुराडी ही धुरांचे लोट हवेत ओकताना दिसतात. विविध हानिकारक वायू आणि धूलिकणयुक्त अशा प्रदूषित हवेत आपण श्वसन करतो. आपल्या नकळतच आपली फुफ्फुसे हळूहळू या प्रदूषणकारी घटकांच्या जणू कचऱ्यापेट्याच होतात.

वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत सतत भर पडत असते. या सर्व गोष्टींमुळे हवेची प्रदूषण पातळी लक्षणीय स्तरापर्यंत वाढली आहे. महानगरांमध्ये हजारो टन कचरा रोज साठतो. रोजच्या रोज कचरा गोळा करून त्याची वाहतूक करणे मोठा बिकट काम असून, त्यासाठी खूप श्रम, आर्थिक नियोजन, कचरा जाण्याची व्यवस्था नीट केली जात नाही.

कचरा नीट जाळला जात नाही, त्यामुळे धुरांचे लोटच्या लोट उठतात. वातावरणात मिसळतात आणि पर्यायाने वातावरण हवा अत्यंत दूषित करतात. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी आणि मानवी समाजाला खूप मोठा धोका आहे हे लक्षात घेऊन त्याबाबत प्रतिबंधक व नियंत्रणाच्या योजना तातडीने हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे.

काळजीपूर्वक नियोजन करून उद्योगधंद्यांची स्थापना करणे, उद्योगधंद्यात चांगल्या पद्धतीची साधनसामुग्री वापरणे नी त्यांचा योग्य तर्‍हेने वापर करणे यामुळेच बरेचसे पर्यावरण टाळता येईल. इंजिने किंवा यंत्रे यामुळे धूर आणि रसायने यांचे हवेतील प्रमाण वाढते आणि रसायने यांचे हवेतील प्रमाण वाढते, म्हणून ती दुरुस्त केली पाहिजेत शक्यतो त्याबदली नवीनच वापरली पाहिजेत.

केवळ प्रदूषण नियंत्रण साधने बसविणे पुरेसे नाही, तर उद्योजकांनी प्रदूषण नियंत्रण साधनांचा सातत्याने आणि कटाक्षाने उपयोग केला पाहिजे. मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी खूप धूर आणि विषारी वायू निर्माण करणारे खत, सिमेंट आणि कीटकनाशकांचे कारखाने किंवा अन्य उद्योग नागरी वस्तीपासून दूर वर उभारलेले पाहिजेत.

कारखान्यात भोवती रस्त्यांच्या कडेला आणि कारखान्यांच्या जवळच्या आवारात खूप मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली पाहिजे. अतिरिक्त कार्बन-डाय-ऑक्‍साईड शोषून घेऊन वातावरणातल्या कार्बन-डाय-ऑक्‍साईड ची पातळी कमी करण्यास मदत करत आहेत हवेतील घटकांचे संतुलन बाळगणे याकडे खास लक्ष दिले पाहिजे.

जागतिक तापमान वाढीला मर्यादा घालण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. विकसित देशांमधील जीवनपद्धती विशेषता पेट्रोलियम उत्पादनांच्या वापराच्या संदर्भात योग्य ते बदल केले पाहिजेत. पुनर्वापर करता येईल अशा ऊर्जास्त्रोतांचा म्हणजे वारा, सौर ऊर्जा सागरी प्रवाह मधून मिळणारी ऊर्जा यांचा उपयोग करता येईल, अशा नव्या पद्धतीचा विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरणात मिसळणाऱ्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी होईल.

खालील काही गोष्टी सहज करता येण्याजोग्या आहेत:-
👉 जवळपासच्या अंतरावर चालत जाणे
👉 थोड्या अंतरासाठी सायकल वापरावी
👉 लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी कार एवजी शाळेची बस वापरावी.
👉 शिसे विरहित पेट्रोल वापरावे.
👉 बागेतील वाळलेली पाने न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.
👉 वातानुकूलित यंत्र किंवा पंखा वापरताना शक्य असल्यास ती खोली सर्वांनी एकत्र वापरावी.
👉 एकाच भागात कार्यालय असल्यास एकत्र मिळून एकाच कारचा वापर करावा.
👉 काळाने आपल्या वाहनाचे पीयूसी (पोलुशन अंडर कंट्रोल) करून घेणे.
👉 शक्यतो कॅटॅलीटीक कन्वर्टर बसून घेणे.
👉 आसपासच्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावावीत व असलेल्या झाडांची काळजी घ्यावी.

वरील सर्व गोष्टी सर्वांच्या हिताच्या असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की त्यांच्याकडे लक्ष दिले गेलेच पाहिजे.

पर्यावरण साखळी मध्ये पाणी हा एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. वनस्पतींची पाने बाष्पाच्या रूपाने शरीरातील पाणी बाहेर सोडतात वनस्पतींच्या अस्तित्वासाठी पाणी आवश्यकच ठरते, आणि नाहीतर वनस्पती नाही, वनस्पती नाही तर अन्न नाही आणि अन्न नाही म्हणजे जीवनच नाही, अशी स्थिती येऊ शकते.

आपल्या परिसरातील नद्या, सरोवर, तलाव, कालवे इत्यादीतील नैसर्गिक पाणी अनेक कारणांमुळे दूषित होते. मलमूत्र मिसळले गेल्याने, गुरेढोरे धूण्यामुळे, कारखान्यातील रासायनिक द्रव्य किंवा कुजके सडके पदार्थ प्रक्रिया न करता ती पाण्यात सोडून दिल्याने पाणी दूषित होते.

अशा पाण्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू निर्माण होतात. ते पाणी शुद्ध न करता प्यायल्यास टायफाईड, जंत, कॉलरा, आमांश, हगवण इत्यादी तसेच सूक्ष्म विषाणूंमुळे कावीळ, पोलिओ, हत्ती रोग इत्यादी उद्भवतात. त्यामुळे मानवी आरोग्य नीट राखण्यासाठी पाण्याचे शुद्धीकरण महत्त्वाचे असते.

पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत जीवजंतू विशेषता रोगजंतूंचा नाश करणे अत्यंत आवश्यक असते. क्लोरीन किंवा अमोनिया मिसळून पाण्यातील रोगजंतूंचा नाश करता येतो. या प्रक्रियेला निर्जंतुकीकरण म्हणतात. पाण्यातील रोगजंतूंचा नाशासाठी जी ब्लिचिंग पावडर चे द्रावण तयार करून अधिक प्रमाणात पाण्यात मिसळतात.

कारखान्यांनी त्यांचे सांडपाणी बाहेर सोडून घेण्यापूर्वी त्यातील धोकादायक रसायने अलग केली तर त्यांच्या मुळे होणारे पाण्याचे प्रदूषण खूप कमी होते.

खालील गोष्टी करून पहा:-
👉 पाणी पिताना पाणी हवे तेवढेच पाणी भांड्यात घ्या.
👉 शॉवर ऐवजी स्नानासाठी बादली, मग यांचाच वापर करा.
👉 घराच्या बाहेर पडण्यापूर्वी नळ बंद आहेत का ते पहा.
👉 नळ चालू ठेवून दात घासणे, दाढी करणे, तोंड धुणे थांबवा.
👉 फ्लश कॉकमुळे फार पाणी लागते म्हणून छोटी बांधणी वापरा.
आणि भरताना ते वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
👉 नळाला पाईप लावून गाडी धुण्या ऐवजी बातमी मग वापरा.
👉 आपल्या इमारतीवर पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवा.
👉 गळणारे नळ टाक्या त्वरित दुरुस्त करा.
👉 ओव्हरफ्लो थांबवा.
👉 वॉशिंग मशीन मध्ये क्षमतेपेक्षा कमी कपडे धुणे एवजी दोन दिवसांचे कपडे एकत्र धुवा.
👉 त्या परिसरात पाणी मुरण्यासाठी माती युक्त जागा ठेवा. कॉंक्रिटीकरण नको.

जमीन हा आपल्या सर्वांचाच मूळ आधार आहे. वनस्पती, प्राणी यासारख्या सजीव सृष्टी बरोबरच आणि वातावरण इत्यादीसारख्या अजैविक पर्यावरणीय घटकांचा सुद्धा वापर करा. बहुतेक प्रकारच्या जमिनीमध्ये वनस्पतींना पोषक अशी अन्नद्रव्य असतात. त्यामुळेच थोडाश्या पेरलेल्या शेतजमिनीवरील बियांपासून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळते. मनुष्यप्राण्याने मात्र जमीन वरती होणारे प्रदूषण, धूप आणि वाळवंटीकरण अशा समस्या निर्माण केल्या आहेत.

भूगोलाचा बराच भाग हा वाळवंटाने व्यापला आहे. १/३ भाग जमीन ओसाड किंवा निम ओसाड झाली आहे. ११ टक्के जमीन कायम बर्फाखाली तर १० टक्के जमीन टंड्रा प्रदेशात आहे. त्यामुळे अर्थातच वापरात येऊ शकेल, अशी फारच थोडी जमीन उपलब्ध आहे. ८३ दशलक्ष हेक्टर शेतजमीन वेगवेगळ्या मातीच्या निकृष्टीकरणाला करणाला तोंड देत असते.

अनेक प्रकारे वेगवेगळ्या पातळ्यांवर तिचा ऱ्हास होत असतो. यामध्ये घरबांधणी, रस्ते बांधणी, उद्योग, खाणकाम, शेती, गुरचराई इत्यादीमुळे जंगल तोड, मातीची धूप, अति सिंचन, पूर, दुष्काळ आणि प्रदूषण या सर्व गोष्टी येतात. पडीक जमीन खारवठणे, अल्कधर्मी, वारा, पाणी यामुळे धूप झालेली अशी सुमारे शंभर दशलक्ष हेक्‍टर जमीन आहे.

रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापरामुळे मातीमधील सुपीकता आणि पोषक घटकांचा नाश होत आहे. मातीमधील क्षारांचे प्रमाण वाढते आहे. तेच पाणी आणि हवेचा झोत अडविणाऱ्या वृक्ष आच्छादनाच्या अभावी माती वाहून जात आहे. वाहून जाणारी माती मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये जाऊन जमा होत आहे.

त्यामुळे धरणांच्या जलाशयांची जलसंचय याची क्षमता वर्षाला एक ते दोन टक्क्यांनी कमी होत आहे. विशेष म्हणजे मनुष्य प्राण्याचा अतिलोभीपणा, हलगर्जीपणा, निष्काळजीपणा बेफिकीर वृत्ती यामुळे सुद्धा गोष्टीनाही ही बाधा पोहोचते आणि प्रदूषणाची समस्या सुरू होऊन ती अधिकाधिक उग्र रूप धारण करते.

चिरस्थायी स्वरूपाची शेती करताना नाजूक, जिवंत माध्यमाप्रमाणे जमिनीची काळजी घ्यावी लागते. जमिनीची अत्यंत जागरूकतेने जोपासना करून दीर्घकाळ सातत्याने उत्पन्न मिळेल, यावर लक्ष केंद्रित करावे लागते. जमिनीची सुपीकता टिकावी व उत्पन्न वाढावे हे म्हणूनच यात पिके घेणे शेणखत किंवा इतर खतांचा वापर करणे, जमिनीची फार नांगरणी न करणे, जमीन ओली असताना त्यावरून येजा न करणे, झाडे लावून अगर पालापाचोळा पसरून जमिनीच्या वरच्या थराचे धूप थांबविणे इत्यादी गोष्टींचा अवलंब करावा.

रासायनिक पदार्थांचा नियमित उपयोग केल्यास किंवा आच्छाद पिके लावल्यास जमिनीचा कस वाढतो, मातीची चांगली मशागत होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची विविधता निर्माण होते.

ऊर्जा संवर्धन म्हणजेच ऊर्जा अधिक परिणामकारकतेने वापरणे तिचा कमीतकमी अपव्यय करणे. काळजीपूर्वक वापर करून ऊर्जा संवर्धन करणे म्हणजे ऊर्जानिर्मिती केल्यासारखेच आहे. म्हणूनच उर्जा संवर्धनही तितकेच महत्त्वाचे ठरते. ऊर्जा निर्मितीपेक्षा ऊर्जेची बचत करणे, आर्थिक दृष्ट्या स्वस्त असते. शिवाय वाचवलेली ऊर्जा इतर कारणांसाठी ही उपलब्ध होऊ शकते. त्यात म्हणजे मर्यादित संसाधनांचा उपयोग करणे हे उत्तम.

दैनंदिन आयुष्यामध्ये ऊर्जेचा अपव्यय करणाऱ्या सवयी खालील प्रमाणे बदलता येतील:-
👉 दिव्यांची गरज नसताना बंद करणे.
👉 जवळ जाण्यासाठी मोटार गाडी अथवा मोटरसायकल वापरण्यापेक्षा पायी चालणे अथवा सायकलचा वापर करणे.
👉 फ्रिजमधील बर्फ नियमाने काढून टाकणे.
👉 दात घासताना नळ बंद ठेवणे.
👉 त्यामुळे नुसते पाणीच वाचत नाही, तर पंपासाठी लागणारी उर्जा देखील वाचते.

नैसर्गिक किंवा कृत्रिम धागा तयार करण्यासाठी, पापड तयार करण्यासाठी, शर्ट शिवण्यासाठी, कटिंग साठी प्लास्टिकची बॅग किंवा पुठ्याचा खोका तयार करण्यास कच्चामाल आणण्यासाठी, तयार माल बाजारात पाठवण्यासाठी अशा प्रत्येक टप्प्यावर प्रचंड ऊर्जा खर्च होते.

ऊर्जेची बिकट समस्या ची जाणीव ज्यांना नाही त्यांच्यामध्ये ही जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. आपण जास्तीत जास्त वृक्ष लावले पाहिजेत आणि इतरांना सुद्धा त्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. अन्न शिजवण्यासाठी खेड्यातील लोकांना सुधारित चुली वापरण्यास समजावले पाहिजे.

अन्न शिजवण्यासाठी लाकडे तोडावी लागू नयेत म्हणून शेतकऱ्यांना गोबर गॅस प्लांट आपल्या आवारात बसून घेण्यास प्रवृत्त करणे. जैविक इंधन सर्वांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या वितरणाची योग्य व्यवस्था करणे. लाकडाचा जीवनात होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रेशर ग्रुपवर लाकडा पासून तयार होणारे गॅस आणि ज्वलन विटांवर चालणाऱ्या स्टोव्हचा पुरस्कार करणे.

याविषयी तंत्रज्ञान आपल्याजवळ आहेत. आपण प्रत्यक्षात उतरविले पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. पर्यावरण हा विषय आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, पण आपल्याला त्याचे गांभीर्य अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. हे समजावे म्हणून हा छोटासा प्रयत्न.

लेखक – अरुण भालेराव

Share this:

  • Twitter
  • Facebook
Tags: EnvironmentPollution
Previous Post

गोव्याला असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोकणातील सिंधुदुर्ग

Next Post

एक प्रार्थना!

Kokanshakti

Kokanshakti

Next Post
Ek prathana

एक प्रार्थना!

Comments 2

  1. प्रकाश धुरी says:
    1 year ago

    अतिशय सुंदर महिती दिली आहे. आज खरोखरच पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. त्यामुळेच दर काही वर्षांनी निसर्ग आपणाला स्वाइन फ्ल्यू, सार्स, करोना यासारखे आजार देतात.

    Reply
  2. Sandeep Mhatre says:
    1 year ago

    Yes, we are all have to be responsible when it comes to the nature.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 85 Followers
  • 23k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Snakes in Konkan

कोकणातील सर्प आणि त्यांच्या प्रजाती

10 May 2020
sateri devi sindhudurg

सिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य !

30 May 2020
maladi

शिवकालीन वारसा लाभलेले, मालवण तकलुक्यातील – निसर्गरम्य मालडी

8 June 2020
lonar lake

उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर!

10 May 2020
malvan temples

सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने

8
devgad beach

सिंधुदुर्गातील १५ लक्षणीय सुमुद्र किनारे तुम्ही नक्की भेटी द्या!

6
ragi seeds नाचणी

मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!

3
कडकनाथ

कडकनाथ… एकदम कडक!

3

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन (Shivsena leader Anant Tare passes away)

22 February 2021
श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!

श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!

16 February 2021
भारत, ऑस्ट्रेलिया ला पण नाही जमल | टी-२० मध्ये असा पराक्रम करणारा पाकिस्तान पहिलाच संघ

भारत, ऑस्ट्रेलिया ला पण नाही जमल | टी-२० मध्ये असा पराक्रम करणारा पाकिस्तान पहिलाच संघ

16 February 2021
vihir

लॉकडाउनमध्ये त्याने चक्क विहीर खोदली!

9 June 2020

Recent News

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन (Shivsena leader Anant Tare passes away)

22 February 2021
श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!

श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!

16 February 2021
भारत, ऑस्ट्रेलिया ला पण नाही जमल | टी-२० मध्ये असा पराक्रम करणारा पाकिस्तान पहिलाच संघ

भारत, ऑस्ट्रेलिया ला पण नाही जमल | टी-२० मध्ये असा पराक्रम करणारा पाकिस्तान पहिलाच संघ

16 February 2021
vihir

लॉकडाउनमध्ये त्याने चक्क विहीर खोदली!

9 June 2020

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • आरोग्य
  • कथा
  • क्रिडा
  • जग
  • तंत्रज्ञान
  • ब्लॉग
  • भटकंती
  • लाईफ स्टाईल
  • वायरल
  • वैयक्तिक ब्लॉग
  • साहित्य

Recent News

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन (Shivsena leader Anant Tare passes away)

22 February 2021
श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!

श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!

16 February 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2021 Kokanshakti with ❤ from Konkan theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2021 Kokanshakti with ❤ from Konkan theme by Jegtheme.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?