देश
‘ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल’, नैराश्यात गेलेल्या डॉक्टरानं पत्नीसह दोन मुलांची केली हत्या
Published
2 years agoon
By
KokanshaktiOmicron Variant In India : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं भारतात शिरकाव केलाय. कर्नाटकमध्ये दोन तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक- एक रुग्ण आढळलाय. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. याच तणावातून एका डॉक्टरने आपला संपूर्ण परिवाराच संपवला. ही घटना जेवढी खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे. ज्यात त्याने लिहिलं की, ‘ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल’. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची हत्या करणारा व्यक्त नैराश्यात होता. या घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार आहे.
कानपूरमधील कल्याणपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. सुशील कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी नैराश्यातून धारधार शस्त्राने आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर मुलाचा आणि मुलीची गळा दाबून जीव घेतला. कुटुंबातील तिघांची हत्या केल्यानंतर सुशील कुमार यांनी आपल्या भावाला मेसेज करत याबाबतची माहिती दिली. यामध्ये नैराश्यात आपण हत्या केल्याचं मेसेजमध्ये सुशील कुमार यांनी म्हटलं. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत डॉक्टर सुशील कुमार फरार झाला होता. पोलिसांनी तिन्हीही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी डॉक्टर सुशील कुमार डिविनिटी अपार्टमेंटमध्ये राहत होते तर रामा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना एक डायरी मिळाली. त्यामध्ये असं लिहिलेलं की, ‘आता हा ओमायक्रॉन व्हेरियंट सर्वांना मारेल. अजून मृतदेह मोजायचे नाहीत. माझ्या निष्काळजीपणामुळेच मी करिअरच्या त्या टप्प्यावर अडकलो आहे. जिथून बाहेर पडणे आता अशक्य आहे. माझं कोणतेही भविष्य नाही. मी पूर्ण शुद्धीत आपल्या परिवाराला संपवत आहे. त्यानंतर स्वत:चेही आयुष्य संपवणार आहे. याला दुसरं कुणीही जबाबदार नाही.’
@kanpurnagarpol के थाना क्षेत्र कल्याणपुर में ट्रिपल मर्डर प्रकरण के सम्बन्ध में पुलिस उपायुक्त पश्चिम द्वारा दी गई बाइट । @Uppolice pic.twitter.com/li2qPRB3xX
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) December 3, 2021
दरम्यान, केवळ एका आठवड्याच्या आत जगभरातील 40 देशांमध्ये हा ओमायक्रॉन पसरला आहे. भारतातही (India)आतापर्यंत ओमायक्रॉनचे (Omicron)चार रूग्ण सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय स्थरावरूनच ओमायक्रॉनबाबत चिंता व्यक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच देशांनी सतर्कता बाळगण्यास सुरूवात केली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनच्या प्रसाराबाबत धोक्याची घंटा दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंचा व्यक्त केली आहे.
You may like
Omicron : ओमायक्रॉन वाढतोय, 14 रुग्णांची भर, देशातील एकूण बाधितांची संख्या 87
बूस्टर डोस देऊनही जगात ओमिक्रॉनचा होतोय वेगाने प्रसार, नवीन वेरिएंट समोर सर्व लसी फेल?
शेअर मार्केटला ओमायक्रॉनचा फटका; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचा 5.80 लाख कोटी रुपयांचा चुराडा
Omicron : ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? काय आहेत या नव्या व्हेरियंटची लक्षणे?
PM Modi Speech Highlights : लसीकरण मोहिमेत व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही : मोदी
भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट असणे अनिवार्य