Connect with us

देश

Jawad Cyclone : ‘जोवाड’ चक्रीवादळाची तीव्रता कमी

Published

on

[ad_1]

Jawad Cyclone Status: जोवाड चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे.  जोवाड पुरी आणि कोणार्कमध्ये आधी धडकणार होते. मात्र चक्रीवादळाने दिशा बदलल्याने तीव्रता कमी झाली आहे. जोवाडमुळे किनारपट्टी भागात मात्र  पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून त्याचे रुपांतर डिप डिप्रेशनमध्ये त्याचे रुपांतर झाले आहे. चक्रीवादळ संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पश्चिम- मध्य बंगालच्या खाडीवरून विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशपासून 180 किमी पूर्व-दक्षिण पूर्व आणि पुरी, ओडिसापासून 330 किमी दक्षिण- दक्षिण- पश्चिम येथे केंद्रित होते. चक्रीवादळ समुद्रातच संपुष्टात येत असल्यानो डिप डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले आहे. डिप डिप्रेशनमध्ये रुपांतर झाल्याने वाऱ्यांचा वेग कमी झाला असून सध्या 75 किलोमिटर प्रति तासाने वारे वाहत आहे. 

आंध्रप्रदेश, उडीशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाममधील भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.  पश्चिमी चक्रीवातामुळे 6 डिसेंबरपासून हिमालय परिसरात जोरदार बर्फवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, काश्मिर आणि उत्तराखंड परिसरात मोठ्या बर्फवृष्टीचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रात उद्यापासून  काय परिस्थिती?

 कोकणात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे.  उद्या देखील मुंबईसह अनेक ठिकाणी धुक्यांची चादर बघायला मिळू शकते.  पुढील आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर वाढणार असून 
10 डिसेंबरनंतर राज्यातील अनेक ठिकाणांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

‘जोवाड’ नाव कसं ठेवलं?

सौदी अरेबियाच्या सूचनेवरून या वादळाला ‘जवाद’ असं नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘उदार’ असा होतो. यापूर्वी आलेल्या चक्रीवादळांच्या तुलनेत या चक्रीवादळामुळे फारसा विध्वंस होणार नाही आणि सामान्य जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

वादळांना नावं देण्याची सुरुवात कशी झाली?

उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे यासाठी 2004 पासून आयएमडीच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आठ देशांनी सुचवलेल्या एकूण 64 नावांच्या यादीचा वापर करण्यात आला. या यादीमधील सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली.  त्यामुळे आयएमडीच्या पुढाकाराने चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये पूर्वीच्या आठ देशांसह आणखी पाच देशांनी सुचवलेल्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमन, पाकीस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिरातीज (युएई) आणि येमेन अशा 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 नावांचा नव्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *