ब्लॉग
Sade Tin Muhurta in Marathi : साडेतीन मुहूर्त म्हणजे काय? आणि अक्षय तृतीया दिवसाचे महत्व!
Published
3 years agoon
By
KokanshaktiSade Tin Muhurta in Marathi: वैशाख महिन्यातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. आज वार रविवार तिथी आहे तृतीया आणि नक्षत्र आहे रोहिणी . याच दिवशी कृतयुगाची व त्रेतायुगाची सुरुवात झाली म्हणून याला दुसरे नाव युगादि असेही आहे.
साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
हिंदू धर्मामध्ये वर्षातील साडेतीन दिवसांना अन्यनसाधारण महत्व आहे आणि ह्या दिवसांना हिंदू वर्षातील शुभ दिवस मानले जाते.
हिंदू परंपरेमध्ये कोणतेही चांगले कार्य करताना मुहूर्त काढण्याची परंपरा आहे. जेणेकरून कोणतेही कार्य बाधा न येते पार पडावे. लग्नापासून ते अगदी वाहनांच्या खरेदीपर्यंत शुभ मुहूर्त काढले जातात. त्याच हिंदू वर्षांमध्ये असे काही दिवस आहेत जे अत्यंत शुभ मानले जातात आणि त्या दिवशी मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते.
हिंदू वर्षातील साडेतीन मुहूर्त
- गुढी पडावा
- अक्षय तृतीय
- दसरा
- कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा)
या चार दिवसांपैकी गुढी पडावा, अक्षय तृतीय आणि दसरा हे पूर्ण मुहूर्त आहेत, तर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी मध्ये येणार पाडवा हा अर्धा दिवसाचा मुहूर्त आहे.
अक्षय तृतीयेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
खेडेगावांमध्ये या सणाला आखिती असेही म्हणतात. म्हणूनच या दिवशी पवित्र कार्य करताना मुहूर्त देखील पाहिला जात नाही. विवाह , मुंज, जायवळ , नामकरण , वास्तुशांती सारख्या अनेक पवित्र गोष्टी या दिवशी करण्याला जास्त प्राधान्य दिले जाते.
अक्षय तृतीया दिवसाला इतके महत्व का ?
- अक्षय तृतीये दिवशी गंगा पृथ्वीवर आली.
- याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्यांची पुरचुंडी दिली आणि अपार मित्रप्रेमापोटी श्रीकृष्णाने सुदाम्याला अपार धनसंप्पती दिली.
- याच अक्षय तृतीयेला अन्नपूर्णेचा जन्म झाला.
- एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने द्रौपदिला अक्षय वस्त्र पुरविले .
- श्रीविष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी परशुरामाचा अवतार याच दिवशी पृथ्वीतलावर प्रकट झाला.
- महाभारताच्या लेखनास प्रारंभ देखील श्रीवेदव्यासांनी याच दिवशी केला.
- अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्रीबद्रिनारायणाच्या मंदिराचे दरवाजे उघडले जातात.
- या साऱ्या घटनांमुळेच अनन्य साधारण महत्व या दिवसाला प्राप्त झालेले आहे.
अक्षय तृतीये दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी ?
अक्षय तृतीया हा दिवस विष्णूच्या कृपेचा दिवस असल्याने व्यंकटेश म्हणजेच श्रीदेव बालाजी चे श्रीलक्ष्मीसह पूजन करावे. श्रीविष्णूच्या नामाचे सहस्त्र जप करावे. असे केल्याने आपल्या पूर्वजांना सदगती मिळते.
तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून दानधर्म करावा, होमहवन करावे असं पुराणात याचा उल्लेख केलेला आहे.
अक्षय तृतीयेची पूजा कशी मांडावी ?
स्वच्छ केलेल्या जमिनीवर चौरंग ठेऊन त्याच्या सभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर श्रीलक्ष्मी विष्णूची प्रतिमा ठेवावी. मधोमध कलश ठेवावा. कलशावर स्वस्तिक रेखाटावे. त्यात नारळ ठेवावा. कलशाच्या समोर दोन पानांवर गणपतीची सुपारी ठेवावी.
शक्य झाल्यास बाळकृष्ण व श्रीयंत्र ठेवावे. पाच ज्योतींची समई लावावी. उदबती धूप दाखवावा. प्रथम बाळकृष्णाची व श्रीयंत्राला अभिषेक करून पूजा करावी. सुगन्धी धूप दीप व फुले वाहून पूजा करावी.
त्यानन्तर गणपतीच्या विड्याची तशीच पूजा करावी. मग श्रीलक्ष्मीविष्णूच्या प्रतिमेचे पूजन करावे. पूजन झाल्यावर विष्णूनामाचा एक सहस्त्र वेळा जप करावा. तदनन्तर नैवेद्य अर्पण करावा.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांना कोणत्या वस्तू दान कराव्यात ?
पूर्वजांना मुक्ती देणारे दान म्हणजेच, मातीचा माठ, तांदूळ, पोहे, दूध दही, कलिंगड, गुळ, चप्पल, छत्री , वस्त्र, यापैकी आपल्या ऐपती प्रमाणे जे आपल्याला शक्य असेल ते दान करावे.
याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे आपण दान करू शकतो, जसे की, गरजू मुलीच्या विवाहासाठी पैशांच्या रूपाने मदत, अन्नदान सोहळा, गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत, पशुपक्ष्याना पाणी, खाद्य देऊन. अशाप्रकारे जर या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या नावे दान धर्म केला तर पुण्य तर मिळतेच शिवाय पूर्वजांना शांति मिळते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराल ?
यादिवशी सोन अवश्य खरेदी करावे. जेणेकरून आपल्या संप्पत्तीची वाढ होते. याशिवाय चांदी तलम वस्त्र , श्रीयंत्र , धार्मिक ग्रन्थ, या वस्तूंची खरेदी करावी याच बरोबर इलेकट्रॉनिक वस्तू, हि खरेदी कराव्यात.
पण या अक्षय तृतीयेला मात्र लॉकडाऊन मुळे आपल्याला काही दानधर्म, खरेदी करता नाही आले तरी मुख्यमंत्री सहायतानिधी मध्ये जास्तीत जास्त मदत करून या वेळची अक्षय तृतीया खऱ्या अर्थाने साजरी करूया.
तर मंडळी आशा करतो तुम्हाला ही महिती नक्कीच आवडली असणार, तर मग वाट कसली बघता. अशा नव नविन महिती वाचण्यासाठी कोकणशक्तिला फेसबूक वर लाइक आणि इंस्टाग्राम वर फोलो करायला विसरु नका!
त्याच बरोबर तुमच्या प्रतिक्रीया आणि सुचना आम्हाला ख़ाली कमेंट करुन जरूर कळवा.