देश
आंब्याचा मोहोर वाढवायचा आहे मग कोकण कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या ह्या गोष्टी आमलात आणा
Published
1 year agoon
By
Editorमध्यंतरीचा (Untimely Rains) अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्वाधिक नुकसान हे (Mango Fruit Crop) आंबा आणि द्राक्ष बागांचे झाले होते. आंब्याला मोहोर लागण्याची प्रक्रियाच मंदावली होती. अता जिल्ह्यासह कोकणातही वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा आंब्याला मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुशंगाने कोकण कृषी विद्यापीठाने फवारणीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. यामध्ये फवारणीच्या माध्यमातून किडरोगराईचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले तर आंब्याला मोहोर लागणार आहे. आता हे पिक अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी हा विद्यापीठाचा पंचसुत्री कार्यक्रम राबवला तर आंबा पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे.
कसे करावे लागणार आहे व्यवस्थापन?
आता पावसाने उघडीप दिली असून वातावरण हे कोरडे झाले आहे. पालघरसह कोकणात 19 ते 23 अंश किमान तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, मोहोर संरक्षण आणि फळांचे व्यवस्थापन ही महत्वाची प्रक्रिया आहे.
आंब्याच्या कैऱ्या ह्या वटाण्याच्या आकाराच्या झाल्या की, प्रत्येक झाडाला 150 ते 200 लिटर पाणी देणे आवश्यक राहणार आहे. अशाच प्रकारे 15 दिवसांच्या अंतराने अंदाजे 3 ते 4 वेळेस अशाप्रकारे पाणी दिल्यास फळगळ ही कमी फळांचा आकार वाढणार आहे. जर फळधारणा होऊन 75 दिवस उलटले असतील तर मात्र, पाणी देण्याची आवश्यकता लागणार नाही. आंब्याच्या मोहोराचे संरक्षण करताना तिसऱ्या व सहाव्या फवारणीच्या प्रसंगी युरियाचे मिश्रण करुन फवारणी केल्यास फळाची वाढ ही जोमात होणार आहे.
मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण
…म्हणून किडीचे व्यवस्थापन गरजेचे
सध्या म्हणावी तशी थंडी नाही. जर थंडीमध्ये खंड पडून उष्णता निर्माण झाली तर मात्र, मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. किडनियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, मोहोराचे संरक्षण होईल अशा किटकनाशकांची फवारणी ही गरजेची आहे. अन्यथा मोहोरावर किडीचा प्रादु्र्भाव झाल्यास पुन्हा मोहोर गळतीचा धोका निर्माण होणार आहे. सध्या वातावरण कोरडे असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली तर मात्र, झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी आहे.
You may like
G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
मार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय
फाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स
अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर
दिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर…
Skin Care : ‘या’ कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या