वायरल

तुम्ही कधी पाहिला नसेल असा भन्नाट षटकार!

ए बी डिविलियर्स ने देखील मारला नाही असा फटका Tik Tok वरील एका मुलाने मारला

सध्या लॉकडावून मध्ये सर्वच क्रिकेट बंद आहे. कोणत्याही प्रकारचे क्रिकेट हे बंद आहे. त्यातच एक टिक टॉक यूजरने एक भन्नाट असा षटकार मारला आहे आणि हा विडियो ७५ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि जवळपास ३९ हजार लोकांनी तो शेअर केला आहे.

क्रिकेटला नेहमीच अनिश्चितेचा खेळ म्हणतात. आपण बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये काही आश्चर्यकारक षटकार पहिले असतील, आणि असे षटकार मारणारा म्हणजे साऊथ आफ्रिकेचा ए बी डिविलीयर्स.

साधारणता आठवड्यापूर्वी टिक टॉक वरच्या एका यूजरने एक विडियो अपलोड केला आहे. त्या विडियो मध्ये तो एक विचित्र पण भन्नाट असा षटकार मरतो. तुम्ही क्रिकेट मध्ये केविन पिटर्सनचा ‘स्विच हीट’ नक्कीच पहिला असेल, पण हा स्विच हीट देखील नाही.

ह्या विडियो मध्ये तो मूलगा चक्क उलटा फिरून षटकार खेचतो. असा मागे फिरून षटकार आम्ही कधी पाहिलेला नाही, जर तुम्ही कधी असा षटकार पहिला असेल तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Tags
Show More
Back to top button
Close
Close