वायरल

लॉकडाउनमध्ये त्याने चक्क विहीर खोदली!

आपल्याला असलेली पाणी टंचाई लक्षात घेऊन युवकाने विहीर खोदली

जशा नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे परिणाम हे चांगले आणि वाईट असतात. कोरोनाच्या महामारीमुळे सुरू असलेला लॉकडाउनचा काळ हा आपणाला बऱ्याच गोष्टी शिकवत आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या भोवतालच प्रदूषण बऱ्याच प्रमाणात घटल आहे.

हे वाचा: मुख्यमंत्र्याना माझे काका म्हणणारी चिमुकली अंशिका आहे तरी कोण?

शिवाय आपण बरेच जण स्वावलंबी बनलो आहोत. लॉकडाउनमध्ये कोणी शेफ, तर कोणी न्हावी, तर कोणी इलेक्ट्रिशियन बनले आहेत. लॉकडाउनच्या आधी जी कामे करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची गरज पडायची अशी बरीचशी कामे आता आपण स्वत: करायला लागलोय.

असाच काहीतरी घडले सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील सातेली तर्फ सातरडा देवळसवाडी येथे घडल. येथे राहणारा २२ वर्षांचा कु. सुधीर सुभाष सावंत याने आपल्या आईच्या मदतीने विहीर खोडून चक्क जीवंत पाण्याचा झरा शोधून काढला.

त्याच झाल अस सुधीरच्या बागेत पाण्याचा पुरवठा कमी होता. पाण्याची असलेली टंचाई लक्षात घेऊन सुधीरने लॉकडाउनचा वेळ घरात बसून घळवण्यापेक्षा स्वत:च विहीर खोदण्याचे ठरवले. त्याने त्याच्या आईच्या मदतीने तसेच इतर जेष्ट व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली बागेमध्ये विहीर खोदण्याचे काम चालू केले.

जसे विहीर खोदणारे कारागीर ज्याप्रमाणे विहीरीचा खड्डा खोदतात अगदी तसाच ह्या युवकाने खड्डा खणला, खोदता खोदता त्याला चक्क एक जीवंत झरा सापडला आणि त्याच्या अथक परिश्रमाना यश आले.

हे वाचा: ए बी डिविलियर्स ने देखील मारला नाही असा फटका Tik Tok वरील एका मुलाने मारला

२२ वर्षाच्या सुधीरने दाखवून दिल की आपण मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा आणि स्वावलंबी कसे बनावे.

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close