Connect with us

Uncategorised

१९५५ मध्ये अमेरिकेतून उडालेले फ्लाईट ९१४, ३० वर्षानंतर उतरले

Published

on

आजही जगभरात घडलेल्या अनेक रहस्यमयी आणि विचित्र गोष्टींबद्दल ऐकायला मिळते. काही रहस्य अजूनही उलगडलेले नाहीये. असेच एक रहस्य म्हणजे फ्लाईट ९१४. हे एक रहस्य आहे, ज्यांचा विचार करणेही शक्य नाही.

१९५५ मध्ये अमेरिकेत एक अशी घटना घडली होती, ज्याने सर्वांनाच हैराण केले होते. अमेरिकेतल्या एका फ्लाईट ९१४ या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर चक्क ३० वर्षानंतर ते देशात लँड झाले होते. पण त्यानंतरही ते काही वेळात लगेच गायब झाले होते.

या विमानाने २ जूलै १९५५ ला अमेरिकेतील न्युयॉर्क शहरातून उड्डाण घेतले होते. मायामीसाठी जाणाऱ्या या विमानात ५७ प्रवासी आणि ६ क्रु मेंबर्स होते. पण विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते आकाशतच गायब झाले. त्यावेळी या विमानाला शोधण्याचा खुप प्रयत्न झाल पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

त्यावेळी नुयॉर्कहून मायामीला जाण्यासाठी ५ तास लागायचे. पण तरीही ते लँड न झाल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की ते विमान नक्की कुठे गेले. पण लोकांना धक्का तर तेव्हा बसला जेव्हा तेच विमान ९ मार्च १९८५ ला रहस्यमय पद्धतीने व्हेनिझुएलाच्या कारकास एअरपोर्टवर लँड झाले.

असे म्हटले जाते की विमानतळावर हे विमान उतरल्यानंतर पायलटखाली उतरला होता. त्याने ग्राऊंड स्टाफला विचारले की हे कोणते वर्ष चालू आहे, तर स्टाफने हे वर्ष १९८५ चालू आहे. तेव्हा पायलट म्हणाला ओ माय गॉड. आणि त्यानंतर त्या विमानाने पुन्हा उड्डाण भरली आणि पुन्हा कधीच ते खाली उतरले नाही. अमेरिका आजही या विमानाचा शोध घेत आहे.

एअर ट्राफिक कंट्रोललाही याबाबत काहीही पुर्वसुचना नव्हती. पण लँडींगच्या काही वेळानंतरच पुन्हा या विमानाने उड्डाण घेतली आणि पुन्हा ते आकाशातच गायब झाले. त्यानंतर ते विमान आजही परत दिसले नाही.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *