Connect with us

आरोग्य

मोबाईलचा अतिवापर करणं एका टी.व्ही. अभिनेत्रीला पडलं महागात

Published

on

mobile

मोबाईल  हा शब्दच इतका प्रिय झाला आहे की , ही  वस्तू गरज बनली आहे.मोबाईल  नसेल  तर आपल्याला काही  सुचणार नाही . बातम्या पहायच्यात  मोबाईल, गाणी  ऐकायचीत मोबाईल , नवीन रेसिपी शिकायची आहे तर सुद्धा मोबाईल, पिक्चर पहाणार तर सुद्धा मोबाईल, टी.व्ही सिरीयल सुद्धा मोबाईलवरच पहाणार.

सर्वात महत्वाचे म्हणजे लहानांपासून ते मोठयांपर्यंत मोबाईलवर गेम खेळणे हा एक महत्वाचा टाईमपास झालेला आहे. याशिवाय सकाळी उठल्यावर व्हाट्सअप, मेल, फेसबुक हे सारे पाहिल्याशिवाय आपल्यला चैन पडत नाही.

हे वाचा: तुळशीची पाने कसे बरे करतील तुमचे आजार ?

थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण पूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेलेले आहोत. एकंदरीत मोबाईलचा वापर आपल्या जीवनात इतका वाढला आहे की, आपण त्याच्या शिवाय राहूच शकत नाही आणि आता तर काय लॉक डाऊन मुळे त्याचा वापर बेसुमार वाढला आहे. म्हणजे काही साऱ्यांना याच व्यसनच लागले आहे. आणि जेव्हा असे व्यसन जडते तेव्हा त्याचे दुष्परिणाम ही दिसून येणारच.

अगदी जवळजवळ २०१० साला पासून सर्रास सर्वांच्याच हातात मोबाईल दिसू लागला. आता तर तो गरिबा पासून ते श्रीमंताकडे, मालकापासून ते कामगारांकडे, शाळाकॉलेजमधील बहुतांश मुलांकडे विविध कंपन्यांचे मोबाईल पहायला मिळतात. 

खरं पाहिलं तर मोबाईलचा शोध ही एक चांगली क्रान्ती म्हणावी लागेल. मोबाईल मुळे या फास्ट युगाशी आपण सहज जोडले गेले आहोत. पण कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली व दुसरी वाईट. यादृष्टीने  पहाता  आपण मोबाईलचा अतिवापर करत असल्याने आज एकाच घरात रहाणाऱ्या  चार व्यक्तींचं एकमेकांशी तासनतास संवाद देखील घडून येत नाही. आज मोबाईलचा दुरुपयोग वाढल्याचे निदर्शनास येत आहे. 

मोबाईलच्या अति वापरामुळे एकाग्रता कमी होते, विशीच्या आतच चष्मा लागतो, भूक मंदावते, अतिवापरामुळे अलजायमर सारख्या आजारांना बळी पडावं लागतं. हृदयाचे ठोके मंदावणे किंवा वाढणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते. काही वेळेस तर कानात इअर फोन लावल्याने आजूबाजूच्या वाहनांचे हॉर्न ऐकू नआल्याने दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते.

आज मोबाईलचा अतिवापर करणं एका टी.व्ही. अभिनेत्रीला महागात पडलं आहे. ही अभिनेत्री आहे उर्वशी ढोलकीया. ही  सद्या एक ट्रेंडिंग नाऊ नावाचा व्हर्च्युअल चॅट करत आहे.  यासाठी तिला सतत फोनवर काम करावं लागत आहे.

शिवाय लॉकडाऊन मुळे घरातील सर्व कामेही तिलाच करावी लागत आहेत. सतत फोनवर काम केल्याने उर्वशीला टेनिस एल्बो या आजाराचा सामना करावा लागत आहे असं तिने स्पॉट बॉयला फोनवरून सांगितले. काही दिवसांपूर्वीच तिला याआजाराचा त्रास होऊ लागला असल्याचे ती सांगते.

हे वाचा: मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!

तिच्या सर्व शोचे काम ती स्वतः फोनवर करते. इतकेच नाही तर एडिटिंगचे काम सुद्धा ती स्वतः करते. तिच्या शोचे सर्वाधिक एपिसोड हे तिने स्वतः एडिट केलेले आहेत. त्यामुळे सतत फोन हातात पकडल्यामळे हाताच्या जॉइंट्स मध्ये वेदना होतात. यालाच वैज्ञानिक भाषेत टेनिस एल्बो म्हणतात. 

जर  असा आजार झाला असेल तर सुरुवातीलाच सावध व्हा. अन्यथा  गंभीर  परिणामांना आपल्याला सामोरे  जावे  लागेल . 

तर  मित्रानो मोबाईल पासून होणाऱ्या सर्व आजारांपासून  वेळीच सावध व्हा. मोबाईलचा वापर आवश्यकतेनुसार करा आणि या मोबाईल वापरा विषयी आपले मत आम्हांला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी  कोकणशक्तिला फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.

नव नवीन मेहंदीच्या डिझाईनसाठी इथे क्लिक करा.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *