Connect with us

क्रिडा

धोनीने दिले निवृत्तीचे संकेत; ‘या’ मैदानावर खेळल्या नंतरच घेणार निवृत्ती.

Published

on

[ad_1]

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करत आहे. आयपीएल २०२१ चा हंगाम संपल्यानंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. धोनी एका ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होता, यावेळी त्याने भारतीय चाहत्यांच्या साक्षीने निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहते. यामुळे तो आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धोनी चेपॉकवर खेळणार शेवटचा सामना

इंडिया सीमेंट्सला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात धोनी बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, “१५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणे अप्रतिम होते. आयपीएल निवृत्तीबाबत विचाराल तर, तुम्ही सर्व माझा सामना पाहण्यासाठी येऊ शकता. यासाठी मी तुम्हाला काही वेळ देईल. चेन्नईमध्ये आपल्या चाहत्यांसमोर निवृत्ती घेण्याची वेगळीच मजा आहे. मी तेथेच माझा अंतिम सामना खेळेल आणि चेपॉकवर माझ्या चाहत्यांना भेटूनच क्रिकेटचा निरोप घेईल.” त्यामुळे धोनी आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

डीआरएसविषयी धोनीने दिली प्रतिक्रिया

या कार्यक्रमात धोनीला डीआरएसबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, “डीआरएसविषयी माझी धारणा सामान्य आहे. हा नियम पंचांच्या चुका सुधारण्यासाठी आणला गेला आहे. अनेकदा फलंदाज याला मस्तीमध्ये घेतात. एक रिव्यू वाचवण्याचा काही फायदा नाहीये. अनेकदा गोलंदाज डीआरएस घेतात आणि ८० टक्के हा निर्णय चुकीचा ठरतो. त्यामुळे गोलंदाजांच्या बाबतीत मी धोडा सावधान राहतो. तुम्ही फक्त एकदा चूक करू शकता आणि मी यामध्ये गोलंदाजाची भूमिका पाहत असतो. जेव्हा तो मला म्हणतो की फलंदाज बाद आहे आणि तू रिव्यू घे, तर मी त्याच्याकडून क्रॉसचेक करून घेतो आणि त्याला पुन्हा विचारतो की,  खरच असे आहे का ?”

पराभवातून तुम्ही खूप काही शिकू शकता – धोनी

चेन्नईने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. धोनी याबाबत म्हणाला की, “आम्ही प्रत्येक हंगामासाठी चांगला सराव करतो. आम्हाला माहीत आहे की, जर आम्ही योजनेप्रमाणे काम केले तर यश नक्की मिळेल. यामुळे आम्हाला परिणामांविषयी चिंता करण्याची गरज पडत नाही. आम्हाला माहीत आहे की, जर आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणे खेळलो तर यश नक्की मिळेल. कोणाच्याही यशस्वी होण्यामागे अपयशाची महत्वाची भूमिका असते. एकदा अपयशी ठरल्यावर तुम्ही दुसऱ्यांदा तीच चूक करू शकत नाही. पराभवातून तुम्ही खूप काही शिकू शकता.”

चेन्नईचा प्ले ऑफमध्ये प्रवेश

दरम्यान, आयपीएलच्या चालू हंगामात धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. चेन्नईने १३ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आहेत आणि संघ १८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यावर्षी चेन्नई आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *