Connect with us

क्रिडा

T20 World Cup चा यजमान भारत असून देखील पाकिस्तानने लिहिलं दुसऱ्या देशाचं नाव, होऊ शकते कारवाई

Published

on

मुंबई : टी-20 विश्वचषक सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी या स्पर्धेचा यजमान भारत आहे परंतु कोरोना विषाणूमुळे भारताऐवजी ओमान आणि यूएई येथे सामने आयोजित केले जात आहे. जरी स्पर्धेचे यजमानपद भारताच्या हातात आहे. अशा स्थितीत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी त्यांच्या जर्सीचे प्रदर्शन सुरू केले आहे. यजमान देश भारताचे नाव न लिहून पाकिस्तानने या जर्सीवर यूएई लिहिले आहे. त्याची ही घृणास्पद कृती त्याला पुन्हा एकदा वादात ओढू शकते.

आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना यजमान देशाचे नाव आणि वर्ष त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूस स्पर्धेच्या नावासह लिहिणे आवश्यक आहे. या अर्थाने, ‘आयसीसी टी-20 विश्वचषक भारत 2021’ असं लिहायचा हवे होते. पण पाकिस्तानने भारतावजी इथे यूएई लिहिले आहे.

जरी पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे आपली विश्वचषक जर्सी प्रदर्शित केलेली नाही, परंतु जर तीच जर्सी दाखवली तर बीसीसीआय आणि आयसीसी यावर कारवाई करू शकते.

आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानची जर्सी सोशल मीडियावर प्रदर्शित केली जात आहे. त्यावर भारताऐवजी यूएई लिहिलेले आहे. यामुळे पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याबद्दल सोशल मीडियावर टीका होत आहे.

भारत या विश्वचषकाचा अधिकृत यजमान आहे आणि अशा परिस्थितीत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या जर्सीवर ‘आयसीसी टी-20 विश्वचषक भारत 2021’ लिहावे लागणार आहे.

जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने जर्सी घातली आहे, ज्यावर यजमान देश भारताऐवजी यूएई असे लिहिले आहे.

सध्या स्कॉटलंड आणि नेदरलँड्सने अधिकृतपणे त्यांची विश्वचषक जर्सी सादर केली आहे, या देशांनी ठरवलेल्या नियमांनुसार यजमान देशाच्या जागी भारताचे नावही लिहिले आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.