×

व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक बंद होताच केएल राहुलने ट्विटरवर अशी घेतली मजा, ‘मोकळ्या वेळेत काय करताय?’

व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक बंद होताच केएल राहुलने ट्विटरवर अशी घेतली मजा, ‘मोकळ्या वेळेत काय करताय?’

[ad_1]

पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल याने व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्यानंतर ट्विटरवर एक मजेदार ट्विट केले, जे खूप व्हायरल होत आहे. सोमवारी (४ ऑक्टोबर) रात्री अचानक जगभर व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ६ तासांसाठी बंद पडले होते. पण या काळात ट्विटरच्या सेवा सुरळीत कार्यरत होत्या.

त्यामुळे पंजाब किंग्जच्या कर्णधाराने लोकांना ट्विट करत विचारले की, ते आपल्या फावल्या वेळेत काय करत आहे. राहुलने आपल्या ट्विटरवर लिहिले, ‘मग प्रत्येकजण आपल्या मोकळ्या वेळेत काय करत आहात?’

राहुलचे हे ट्विट व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यावर काही मजेदार कमेंट्सही केल्या.

तसेच केएल राहुलने मंगळवारी त्याचे दोन फोटो पोस्ट करत लिहिले की ‘काल रात्रीचे पोस्ट पुन्हा शेड्यूल करावे लागले, ग्रामचे आभार’.

आयपीएल २०२१ चा हंगाम राहुलसाठी कर्णधार म्हणून विशेष राहिला नसेल, पण फलंदाज म्हणून हा हंगाम त्याच्यासाठी खूप चांगला गेला आहे. राहुलने १२ डावांमध्ये ५२.८० च्या सरासरीने एकूण ५२८ धावा केल्या आहेत. या दरम्यान राहुलने १२९.०९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि पाच अर्धशतके देखील केली आहेत. राहुलकडे सध्या या स्पर्धेची ऑरेंज कॅप आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड त्याच्यापेक्षा थोडाच मागे आहे आणि तो ५२१ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर केएल राहुलने पंजाब संघाच्या फलंदाजीवर ताशेरे ओढले होते. सामन्यानंतर बोलताना राहुल म्हणाला की, त्याच्या संघात मध्यम फळीत प्रमुख भूमिका निभावू शकणारा कोणताही फलंदाज नाही आणि हेच कारण आहे की, त्याचा संघ अगदी जवळच्या पराभवाला सामोरे जात आहे.

या दरम्यान, त्याला विचारण्यात आले की सलग २-३ हंगामासाठी ऑरेंज कॅप मिळाल्यानंतर त्याला कसे वाटत आहे? याला उत्तर देताना राहुल म्हणाला, ‘मी असे म्हणणार नाही की मला ही कामगिरी आवडली नाही, पण आमचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरल्यास मला अधिक आनंद होईल. या सामन्याचे लक्ष्य १०-१६ धावांनी अधिक होते. मॅक्सवेलसारखा फलंदाज जेव्हा उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघासाठी गोष्टी कठीण होतात. पण गेली अनेक वर्षे सातत्य हरवून बसलेल्या फलंदाजांमुळे आमचा संघ निराश झाला आहे. खरे सांगायचे तर आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराश केले आहे.

या दरम्यान, केएल राहुलने युवा खेळाडूंचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांनी त्यांच्या कामगिरीद्वारे बरेच प्रभावित केले आहे, ते संघासाठी चांगले करू शकतात. परंतु, आम्हाला मधल्या फळीच्या फलंदाजांबद्दल विचार करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

अरर! उर्वशी रौतेलाने एकदिवस उशीरा दिल्या पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

विराट ‘रनमशीन’ असेल तर रोहित ठरतोय भारताचा ‘सिक्सरमशीन’! ४०० वा षटकार मारत केलाय मोठा पराक्रम

धमाकेदार अर्धशतकासह मुंबईचा ‘एकहजारी मनसबदार’ बनला ईशान

[ad_2]

Previous post

१०  विरुद्ध ०७ मतांनी विजय संपादन करून शितल आंगचेकर बनल्या वेंगुरला नगर परिषदेच्या नूतन उपनगराध्यक्ष

Next post

अशा प्रकारे झाली एका कृषी कंपनीची सर्वात मोठी आयटी कंपनी, नाव वाचून थक्क व्हाल!

Post Comment