Connect with us

क्रिडा

प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलीला दीपक चाहरने केले प्रपोज केले, जाणून घ्या कोण आहे ही ‘ती’ तरुणी?

Published

on

[ad_1]

दुबई : चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) अष्टपैलू दीपक चहरसाठी (Deepak Chahar) गुरुवार म्हणजेच कालचा दिवस विशेष ठरला. सामन्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केलं. या दोघांमधील हा भावनीक क्षण आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी टीव्ही किंवा सोशल मीडियावर पाहिला आणि आपण सगळे त्याच्या या क्षणात सहभागी झालो(Deepak Chahar Proposes to Girlfriend in The Stands After IPL 2021 Match) . दीपक चाहरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. परंतु त्यानंतर चाहत्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थीत झाला आहे की, ही तरुणी नक्की आहे तरी कोण?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवळ-जवळ सगळेच लोकं सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर या तरुणीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागले. तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती देणार आहोत.

दिपकने (Deepak Chahar) प्रपोज केलेल्या तरुणीचे नाव जया भारद्वाज आहे, जया भारद्वाज ही बिग बॉसची माजी स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. दिपक चहर आणि जया दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील, असे सुत्रांनी सांगितले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या दोघांमधील नातं खूपच घट्ट होतं गेलं. (Deepak Chahar)

आयपीएलच्या हंगामानंतर त्यांचे लग्न होईल अशी देखील माहिती समोर येत आहे. जया ही दीपकसोबत आयपीएलसाठी दुबईला गेली आहेत.

प्रपोज केल्यानंतर दीपकने जयाची संपूर्ण टीमशी ओळख करून दिली. दीपक आपले सह खेळाडू युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची योजना आखत आहे आणि लवकरच त्याची लेडी लव्ह जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली जाणार आहे. जया मूळची दिल्लीची आहे आणि एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करते.

दीपक बॉलिवूड मॉडेल आणि अभिनेत्री मालती चाहरचा छोटा भाऊ आणि क्रिकेटर राहुल चाहरचा मोठा भाऊ आहे. जानेवारी 2020 मध्ये, चहरने बांगलादेशविरुद्ध सात धावा देऊन सहा विकेट घेतल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी -20 चांगल्या कामगिरीचा पुरस्कार जिंकला आहे. जयाने बिग बॉस 5 आणि स्प्लिट्सविला 2 सारखे टीव्ही शो केले आहेत.

[ad_2]