Connect with us

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर विमानाचे सुरक्षित ‘टेस्ट लँन्डिग’ !

Published

on

चिपी(भरत केसरकर) दि. ६ : वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पावर बुधवारी गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा 24 मिनिटाचा अलायन्स एअरच्या विमानाने सुरक्षित प्रवास केरून ‘टेस्ट लँन्डिंग’ यशस्वी केले. आता विमानतळ लोकार्पण सोहळा अवघ्या दोन दिवसावर येवुन ठेपला असल्याने तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा त्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.

तब्बल वीस वर्षानंतर सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे आता शनिवार दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रिय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

त्या पार्श्वभुमीवर एमआयडीसी, आयआरबी व विमान कंपनीने नियोजन सुरू केले आहे. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमिवर दोन दिवस आधीच गोवा ते सिंधुदुर्ग असा अलायन्स एअरच्या विमानाने अवघ्या 24 मिनिटाचा प्रवास केला. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाप विमानासोबत होता. यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही झाले. त्यानंतर एका तासाने अलायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ घेत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सन 2018 मध्ये केंद्रिय हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभु व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर असताना अशाच प्रकारे गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मुर्ती घेवुन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभुही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पुर्ण नसल्याने केंद्रिय हवाई वाहतुक मंत्रालयाकडुन विमानतळास परवानगी मिळाली नव्हती.

आता विमानतळाचे काम पुर्ण झाल्याने डिजीसीएकडुन सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभुमीवर बुधवारी विमानाचे टेस्ट लँन्डिंग यशस्वी पार पडले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *