Connect with us

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

Published

on

वैभववाडी (प्रतिनिधी) :जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड जाहीर होताच वैभववाडी भाजपच्या वतीने फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी धक्कातंत्र वापरत बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांच्या नावाची घोषणा केली.

निवड जाहीर होताच वैभववाडी तालुका भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. नारायण राणे आगे बढो…, नितेश राणे आगे बढो… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, वैभववाडी भाजप किसान मोर्चा अध्यक्ष महेश संसारे, संजय सावंत, कोकिसरे सरपंच दत्ताराम सावंत, सुनील भोगले, किशोर दळवी, प्रकाश पाटील, आबा गुरव, बाळा वाडेकर, बंधू वळंजू, प्रदीप जैतापकर, संताजी रावराणे, उदय पांचाळ, रमेश शेळके, प्रमोद सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते.