सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात चालक पोलीस शिपाई पदांसाठी 13 ऑक्टोबरला लेखी परीक्षा
Published
2 years agoon
By
Kokanshaktiजिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 20 चालक पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी 13 ऑक्टोबर रोजी कुडाळमधील संत राऊळ महाराज विद्यालय, कुडाळ हायस्कूल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज, एमआयडीसी या परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक एस.बी.गावडे यांनी दिली.
या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र ( Hall ticket) उमेदवारांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.
उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या परीक्षाकेंद्रांवर ओळखपत्रासह (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना इ.) वेळेत उपस्थित रहावे.
उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी 18002100309 (सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत) bhartimahapolice@gmail.com, पोलीस भरती मदत केंद्र, 02362- 228008 व पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228614 या वर संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
You may like
जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
जलवाहतुकीने कोकणातील पर्यटन बहरणार; रो-रो सेवेला मिळतेय अधिक पसंती, जलमार्गाने पाहता येतेय नैसर्गिक सौंदर्य
Hapus Mango : देवगड हापूस आंब्याचे बाजारात आगमन, पेटीचा भाव 18 हजार रुपये
कोकणच्या विकासाने भरारी घेतली | कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘कुडाळेश्वर’च्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला आज पासून सुरुवात